अर्जापूर पाणी योजनेचा श्रीगणेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 11:53 PM2018-02-27T23:53:23+5:302018-02-27T23:53:44+5:30

राज्य शासनाच्या जलस्वराज्य प्रकल्प - २ अंतर्गत अर्जापूर या गावातील पाणीपुरवठा योजनेच्या भूमिगत विहीर व जलकुंभ बांधकामास प्रारंभ झाला़ काम युद्धपातळीवर सुरू असल्याने आॅक्टोबरअखेर गावाला शुद्ध पाणीपुरवठा होईल, असा अंदाज आहे़ दरम्यान, राज्यात राबविणाºया अद्ययावत सुधारित पाणीपुरवठा प्रकल्पासाठी जागतिक बँकेने पाच कोटींचे अर्थसहाय्य दिलेले आहे़

Arjun Water Scheme | अर्जापूर पाणी योजनेचा श्रीगणेशा

अर्जापूर पाणी योजनेचा श्रीगणेशा

googlenewsNext
ठळक मुद्देबिलोली : जागतिक बँकेकडून ५ कोटींचे अर्थसहाय्य, आॅक्टोबरअखेर शुद्ध पाणीपुरवठा

राजेश गंगमवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
बिलोली : राज्य शासनाच्या जलस्वराज्य प्रकल्प - २ अंतर्गत अर्जापूर या गावातील पाणीपुरवठा योजनेच्या भूमिगत विहीर व जलकुंभ बांधकामास प्रारंभ झाला़ काम युद्धपातळीवर सुरू असल्याने आॅक्टोबरअखेर गावाला शुद्ध पाणीपुरवठा होईल, असा अंदाज आहे़ दरम्यान, राज्यात राबविणाºया अद्ययावत सुधारित पाणीपुरवठा प्रकल्पासाठी जागतिक बँकेने पाच कोटींचे अर्थसहाय्य दिलेले आहे़
राज्य शासनाने जलस्वराज्य-२ या योजनेत तालुक्यातील अर्जापूर व सगरोळीचा समावेश केला़ पाच व सात कोटी खर्च होणाºया योजनेअंतर्गत संपूर्ण नियंत्रण संगणक पद्धतीने होणार आहे़ ग्रामपंचायत कार्यालयात बसूनच नदीपात्रातील मोटार रिमोट कंट्रोलद्वारे बंद-चालू करता येणार आहे़ गावातील नळधारकांना मीटरद्वारे पाणी रिडींग घेतले जाणार आहे़ प्रतिलिटर एक पैसा याप्रमाणे नाममात्र दर आकारला जाईल़ भूमिगत विहिरीसाठी सौर सोलार यंत्रणा अवलंबल्याने वीजपुरवठा खंडित अथवा भारनियमनाची समस्या राहणार नाही़ त्याचप्रमाणे जलकुंभ भरल्याबरोबर संगणकावर सूचना मिळेल़ तसेच २४ तास शुद्ध फिल्टर पाण्याचा पुरवठा होईल़ संपूर्ण अद्ययावत जागतिक पातळीवर तपासणी केलेली आॅटोमॅटीक यंत्रणा अवलंबण्यात येणार आहे़ सोलार ऊर्जा पद्धतीने वीजपुरवठा असल्याने वीजबिलाचा आर्थिक भार ग्रा़ पं़ ला़ बसणार नाही़ प्रारंभी एक वर्ष चाचणी पद्धतीवर ठेकेदार यंत्रणा चालवतील तद्नंतर ग्रा़पंक़डे सोपवण्यात येईल़

शैक्षणिक सुविधा असलेल्या याच अर्जापूरची ओळख विविध उपक्रम राबवित असल्याने चर्चेतील गाव आहे़ दोन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर येथे मसनजोगी समाजाची उपेक्षित महिला सरपंच झाली़

संपूर्ण राज्यातून मसनजोगी या भटक्या समाजाची एकमेव महिला सरपंच झाल्याची नोंद शासनदरबारी झाली़ आता जलस्वराज्य-२ ही अद्ययावत पाणीपुरवठा योजना अर्जापूरला होत आहे़ पाच कोटी खर्च होत असलेल्या योजनेअंतर्गत माचनूरच्या मांजरा नदीपात्रात भूमिगत विहिरीचे काम त्यापाठोपाठ २ लाख लिटर क्षमता असलेल्या जलकुंभाचेही बांधकाम सुरू झाले़ आगामी आॅक्टोबरअखेर काम पूर्ण होईल, असा आशावाद व्यक्त केला जातो़

Web Title: Arjun Water Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.