अत्याचारानंतर खून करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:25 AM2019-02-25T00:25:51+5:302019-02-25T00:29:05+5:30

नात्यातील महिलेला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्यानंतर खून करणा-या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे़ हा आरोपी पुसद येथे पळून गेला होता़

The arrest of the murderer after the atrocities | अत्याचारानंतर खून करणाऱ्यास अटक

अत्याचारानंतर खून करणाऱ्यास अटक

Next
ठळक मुद्देकिनवटची घटना आरोपीच्या पुसद येथून आवळल्या मुसक्या

नांदेड : नात्यातील महिलेला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्यानंतर खून करणा-या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे़ हा आरोपी पुसद येथे पळून गेला होता़
किनवट तालुक्यात मांडवा रस्त्याच्या कडेला असलेल्या एका नाल्यात मुक्ता इंगळे या महिलेचा मृतदेह २३ फेब्रुवारी रोजी सापडला होता़ किनवट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली असता मुक्ता इंगळे यांच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे दिसून आले़ महिलेची ओळख पटल्यानंतर माधव विठ्ठल इंगळे यांच्या तक्रारीवरुन किनवट पोलीस ठाण्यात अत्याचारासह खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता़ या प्रकरणात पोलीस अधीक्षक संजय जाधव, पोनि़ सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विनोद दिघोरे, सदानंद वाघमारे यांच्या पथकाने तपास सुरु केला होता़ दिघोरे यांना आरोपीची खब-याकडून माहिती मिळाली़
त्यानंतर आरोपी ज्ञानेश्वर धनाजी इंगळे (वय २१, रा़लोहरी ता़पुसद ) याला अटक केली़ सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे देणा-या ज्ञानेश्वर याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली़
मयत मुक्ता व आरोपी ज्ञानेश्वर हे दोघे नगर जिल्ह्यात राजनंदगाव येथील अशोक आलेकर यांच्या शेतावर कामावर होते़ त्यावेळी मुक्ता हिने आरोपी ज्ञानेश्वरचे २५ हजार रुपये चोरले होते़ यातून त्यांचा वाद झाला होता़
मुक्ता हिने नंतर ज्ञानेश्वरला जत्रेसाठी बोलावून घेतले होते़ मुक्ता, ज्ञानेश्वर यांनी मुक्ताची मुलगी पायल हिला शाळेत सोडले़ त्यानंतर ज्ञानेश्वर याने जंगलात नेवून मुक्तावर अत्याचार केला़ त्यानंतर तिचा खून करुन प्रेत रस्त्याच्या कडेला टाकले़ ज्ञानेश्वरला पोलीस कोठडी सुनावली आहे़

Web Title: The arrest of the murderer after the atrocities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.