अशोक चव्हाण विधानसभेच्या रिंगणात ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:18 AM2018-11-16T00:18:47+5:302018-11-16T00:22:50+5:30

उमेदवारी बाबत पक्षाचे केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल, जी जबाबदारी देईल ती आपण पार पाडू असेही त्यांनी बैठकीत स्पष्ट केल्याने खा़चव्हाण विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचे संकेत मिळत आहेत़

Ashok Chavan in the Legislative Assembly? | अशोक चव्हाण विधानसभेच्या रिंगणात ?

अशोक चव्हाण विधानसभेच्या रिंगणात ?

Next
ठळक मुद्देमुंबईत आढावाकार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींना कळविणार असल्याचे केले स्पष्ट

नांदेड : खा़ अशोक चव्हाण यांनी विधानसभेची निवडणुक लढवुन महाराष्ट्रातच सक्रीय रहावे अशी कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे़ कार्यकर्त्यांच्या याच भावना गुरुवारी खा़ चव्हाण यांनी मुंबई येथील आढावा बैठकीत बोलून दाखविल्या़ मात्र उमेदवारी बाबत पक्षाचे केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल, जी जबाबदारी देईल ती आपण पार पाडू असेही त्यांनी बैठकीत स्पष्ट केल्याने खा़चव्हाण विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचे संकेत मिळत आहेत़
काही महिन्यापूर्वी विष्णूपुरी येथे झालेल्या एका कार्यक्रमात जिल्ह्यातील स्थानिक कार्यकर्त्यांनी खा़अशोकराव चव्हाण यांनी आगामी निवडणूक दक्षिण विधानसभा मतदारसंघातून लढवावी असा आग्रह धरला होता़ विशेष म्हणजे याच कार्यक्रमात आ़अमरनाथ राजूरकर यांनीही नांदेडकरांच्या भावना बोलून दाखविल्या होत्या़ खा़चव्हाण यांनी विधानसभेची निवडणूक दक्षिण मतदारसंघातून लढविल्यास काँग्रेसची जिल्ह्यात आणखी एक जागा वाढेल असे विधान करीत कार्यकर्ते आपणाकडे भावी मुख्यमंत्री म्हणुन पाहत आहेत़ त्यामुळे लोकसभेएवजी विधानसभा लढविल्यास दक्षिण मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने काँग्रेस निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला होता़
आ़राजूरकर यांनी केलेल्या या विधानानंतर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात हा विषय चांगलाच चर्चेला आला होता़ विशेषत: भाजप-सेनेसह विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या विधानाचा धसका घेतल्याचे चित्र होते़ तर काहींनी विधानसभा लढविण्याची ही गुगली म्हणजे पक्षांतर्गत इच्छूकांना दिलेला इशारा असल्याचे म्हटले होते़
दरम्यान, मुंबई येथील टिळक भवनात गुरुवारी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला़ या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ आणि बी़ एम़ संदीप यांचीही उपस्थिती होती़ या बैठकीत नांदेडचा विषय निघाल्यानंतर नांदेडमधील पदाधिकाऱ्यांनी खा़ चव्हाण यांनी विधानसभेच्या रिंगणात उतरावे अशी आग्रही मागणी केली़ यात आ़अमरनाथ राजूरकर, आ़ वसंतराव चव्हाण, महापौर शिलाताई भवरे, उपमहापौर विनय गिरडे, स्थायी समिती सभापती शमीम अब्दुला, जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलिकर यांच्यासह पदाधिकारी आघाडीवर होते़ खा़चव्हाण यांनी विधानसभा लढविल्यास जिल्ह्यातील काँग्रेसच्या जागा आणखी वाढतील असा दावाही या पदाधिकाºयांनी बैठकीत केला़ यावर अशोकराव चव्हाण यांनी ‘मी’ नांदेड जिल्ह्यातून विधानसभा निवडणुक लढवावी अशी इच्छा काँग्रेस कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत़ लोकसभा आणि विधानसभा यातील कुठल्याही निवडणुकीची माझी तयारी आहे़ मात्र या संदर्भात पक्षाचे केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल, जी जबाबदारी पक्ष देईल ती आपण पार पाडू असे खा़अशोक चव्हाण यांनी या बैठकीत स्पष्ट केले़दरम्यान, खा़अशोक चव्हाण यांना पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविल्यास आ़वसंतराव चव्हाण काँग्रेसकडून खासदारकीचे उमेदवार असतील अशी शक्यता वर्तविली जात होती़ मात्र वसंतराव चव्हाण यांनी नायगाव मधूनच लढावे असाही तेथील कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याने आ़अमिता चव्हाण यांचाच पर्याय काँग्रेससाठी दिसतो आहे़
अशोक चव्हाण नेमके कोणत्या विधानसभा मतदारसंघातून उतरतील याचीही चर्चा आता जोर धरु लागली आहे़ नांदेड दक्षिण बरोबरच भोकर विधानसभा यापैकी एका मतदारसंघातून ते विधानसभेची निवडणूक लढविण्याची शक्यता आहे़ त्यातही भोकर मतदारसंघाला ते अधिक प्राधान्य देवू शकतात़ अशा पद्धतीचे उलटफेर झाल्यास काँग्रेसचा फायदा होण्याचीच शक्यता आहे़
तर लोकसभेसाठी अमिता चव्हाण असतील उमेदवार
खा़अशोक चव्हाण यांनी विधानसभा निवडणुक लढवावी असा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा आग्रह आहे़ खा़ चव्हाण यांच्यावर राज्याची जबाबदारी आहे़ त्यामुळे विधानसभेसाठी अशोक चव्हाण उभे राहिल्यास लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ते राज्यभरात फिरु शकतात़ याचा पक्षाचाही मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे आ़ राजूरकर यांनी या बैठकीत स्पष्ट केले़ खा़ चव्हाण यांना विधानसभेसाठी पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखविल्यास काँग्रेसकडून लोकसभेसाठी चव्हाण यांच्या कुटुंबातीलच सदस्यास उमेदवारी द्यावी असाही आग्रह धरण्यात आलेला असल्याने संभाव्य उमेदवार म्हणुन आ़अमिता चव्हाण यांचे नाव पुढे येत आहे़ याबरोबरच खा़ अशोक चव्हाण यांच्या दोन कन्यापैकी एकीचे लाँचिगही आगामी निवडणुकीच्या माध्यमातून होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे़

Web Title: Ashok Chavan in the Legislative Assembly?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.