अशोकराव पोहोचले गारपीटग्रस्तांच्या बांधावर; शेतकऱ्यांसोबत साधला संवाद

By श्रीनिवास भोसले | Published: March 17, 2023 07:08 PM2023-03-17T19:08:12+5:302023-03-17T19:13:38+5:30

जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, मुदखेड, उमरी या तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.

Ashokrao reached the dam of hail victims; Interaction with farmers | अशोकराव पोहोचले गारपीटग्रस्तांच्या बांधावर; शेतकऱ्यांसोबत साधला संवाद

अशोकराव पोहोचले गारपीटग्रस्तांच्या बांधावर; शेतकऱ्यांसोबत साधला संवाद

googlenewsNext

नांदेड : जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाने केळीच्या बागांसह खरबूज टरबुजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून अधिकाधिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, मुदखेड, उमरी या तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. जोराचा वारा आणि पावसाने केळीच्या बागा आडव्या झाल्या. हाती आलेले तरबुज खरबूज गारानी सडले. दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड येथे पोहोचताच शुक्रवारी सकाळी मुदखेड भागातील नुकसानीची पाहणी केली. निवघा ता.मुदखेड येथील गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.

तत्काळ मदत द्यावी 
ज्यांचा पीक विमा आहे त्यांना पीकविमा व ज्यांचा पीक विमा नाही त्यांना तात्काळ मदत शासनाने करावी. - अशोकराव चव्हाण

विमा कंपन्यांना माहिती कळवा
वादळ, गारपिटीमुळे जिल्ह्यात काही भागात झालेल्या नुकसानीचा आढावा जिल्हा प्रशासनातर्फे घेतला जात आहे. नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणीच्या सूचना दिल्या आहेत. आपल्या पिकांचे नुकसान झाल्याची पुर्वसुचना पिक विमा कंपनीला शेतकरी बांधवांनी कळवावी.
- जिल्हाधिकारी अभिजित राऊत

Web Title: Ashokrao reached the dam of hail victims; Interaction with farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.