ज्येष्ठांच्या मागण्या अर्थसंकल्पात मान्य करण्यासाठी पंतप्रधानांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:17 AM2021-01-21T04:17:13+5:302021-01-21T04:17:13+5:30
कष्टात आणि हलाखीत जीवन जगणार्या ज्येष्ठ नागरिकांच्या हालअपेष्टा दूर करून त्यांना दरमहा तीन हजार रूपये मानधन मंजुर करावे आणि ...
कष्टात आणि हलाखीत जीवन जगणार्या ज्येष्ठ नागरिकांच्या हालअपेष्टा दूर करून त्यांना दरमहा तीन हजार रूपये मानधन मंजुर करावे आणि ज्येष्ठांच्या इतर प्रलंबित मागण्या मान्य करणेसाठी वारंवार निवेदन, मोर्चे, सत्याग्रह, उपोषण आदी करूनही आजपर्यंत ज्येष्ठ दुर्लक्षीतच राहिलेले आहेत. ज्येष्ठ नागरिकांची कुचेष्टा करण्यात आली. अपु-या धोरणाची अंमलबजावणी पण करण्यात आली नाही. ज्येष्ठांची एकही न्याय मागणी मान्य न करण्यात शासनाने धन्यता मानली. तरी आता येत्या अधिवेशनात ज्येष्ठांच्या खालील प्रलंबीत मागण्या मान्य होणेची ज्येष्ठांना अपेक्षा आहे. विशेषतः महाराष्ट्र ज्येष्ठाची वयोमर्यादा ६५ वरून ६० करावी, निराधार आणि गरजू ज्येष्ठांना प्रतिमहा तीन हजार रूपये मानधन द्यावे, दारिद्रयरेषेची अट रद्द करावी आणि प्रवासात ५ टक्के जागा ज्येष्ठासहित आरक्षीत ठेवाव्यात या ज्येष्ठांच्या प्रमुख मागण्या आहेत.