भोकर येथील कुस्त्यांच्या फडातून पहेलवान पळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:18 AM2018-02-18T00:18:23+5:302018-02-18T00:19:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भोकर: महाशिवरात्रीनिमित्त आयोजित यात्रेत शुक्रवारी प्रथम क्रमांकाची अखेरची कुस्ती होत असताना एका पहेलवानाने अचानक पळ काढल्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकर: महाशिवरात्रीनिमित्त आयोजित यात्रेत शुक्रवारी प्रथम क्रमांकाची अखेरची कुस्ती होत असताना एका पहेलवानाने अचानक पळ काढल्यामुळे कुस्ती पाहणा-या असंख्य दर्शकांचा हिरमोड झाला.
मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या यात्रेत शनिवारी दुपारपासून महादेव मंदिरासमोरील मैदानात कुस्त्यांचा फड रंगला होता. कुस्त्यानिमित्त अनेक नामवंत पहेलवानांनी हजेरी लावली होती. दिवसभरात अनेक पहेलवानांनी जिवाची बाजी लावत आपले कसब दाखवून कुस्त्यात रंगत आणली. सायंकाळी अखेरची कुस्ती पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली होती. मौजे बितनाळ (ता.उमरी) येथील पहेलवान संजय उमाटे विरुद्ध दिल्लीचा पहेलवान कुलदीप या दोघांत कुस्ती लागली. कुस्ती चांगलीच रंगली. प्रेक्षकांचीही उत्सुकता वाढली. अखेर कुलदीपपुढे संजयचे काही चालले नाही. त्याने मैदान सोडून पळ काढला. पंचकमिटीने दिल्लीचा पहेलवान कुलदीपसिंग दहिया यास विजयी झाल्याचे घोषित करून जल्लोष केला. स्पर्धेसाठी तहसीलदार व्यंकटेश मुंडे, पोनि आर.एस. पडवळ, यात्रा कमेटीचे अध्यक्ष नागनाथ घिसेवाड, नगरसेवक केशव मुद्देवाड, व्यवस्थापक दिलीप वाघमारे, पालिका कर्मचारी उपस्थित होते.