भांडणाचे रेकॉर्डिंग केले म्हणून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:17 AM2021-03-28T04:17:23+5:302021-03-28T04:17:23+5:30
किराणा दुकान मालकावर गुन्हा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नांदेडात गुरुवारपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. दुपारी बारा वाजेपर्यंतच किराणा व फळांची ...
किराणा दुकान मालकावर गुन्हा
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नांदेडात गुरुवारपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. दुपारी बारा वाजेपर्यंतच किराणा व फळांची दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु ठराविक वेळेनंतरही दुकान उघडे ठेवणाऱ्या एका मालकाच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शहरातील जुना मोंढा भागात महेश किराणा दुकान हे २६ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत उघडे होते. यावेळी पोलिसांना पेट्रोलिंगमध्ये ही बाब आढळून आली. दुकान मालक तोंडाला मास्क न लावता होता. या प्रकरणात पोउपनि सुरजितसिंग माळी यांच्या तक्रारीवरुन वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पैशाच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ
पैशाच्या मागणीसाठी जिल्ह्यात दोन विवाहितांचा छळ करण्यात आला आहे. शहरातील गोकुळनगर भागात माहेराहून दोन लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेला मारहाण करण्यात आली. तसेच तिच्या इच्छा विरुद्ध गर्भपात करण्यात आला. तर प्लॉट खरेदी करण्यासाठी माहेराहून ४० लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी पीडितेला उपाशीपोटी ठेवून मारहाण करण्यात आली. या प्रकरणात हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तडखेल शिवारात जुगारावर धाड
देगलूर तालुक्यातील तडखेल शिवारात जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड मारली. या ठिकाणी तिर्रट नावाचा जुगार सुरु होता. पोलिसांनी सहा हजार रुपये जप्त केले. याप्रकरणात पोउपनि बसवेश्वर जकीकोर यांच्या तक्रारीवरुन देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.