गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सोपवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:15 AM2021-01-02T04:15:10+5:302021-01-02T04:15:10+5:30
तालुक्यातील शिक्षण विभागाचा कारभार प्रभारीवर चालू आहे . लोहा येथील रवींद्र सोनटक्के यांच्याकडे कंधार ता. गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त भार ...
तालुक्यातील शिक्षण विभागाचा कारभार प्रभारीवर चालू आहे . लोहा येथील रवींद्र सोनटक्के यांच्याकडे कंधार ता. गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त भार आहे. परंतु ते १ डिसेंबरपासून वैद्यकीय कारणास्तव रजेवर होते. त्यामुळे १७ केंद्रांतर्गत १८७ जि.प. शाळेतील प्राथमिक शिक्षक ,मुख्याध्यापक ,प्राथमिक पदवीधर शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी ,शिक्षण विस्तार अधिकारी आदीचे वेतन बिले दाखल करणे ,भविष्य निर्वाह निधीचे प्रस्ताव, वैद्यकीय देयके ,थकबाकी देयके आदींवर स्वाक्षऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला होता.
गटशिक्षणाधिकारी वैद्यकीय कारणास्तव रजेवर गेल्याने शिक्षण विभागाची प्रशासकीय यंत्रणा ठप्प झाली होती. शिक्षक आपल्या देयकासाठी हेलपाटे घालत होते. वेतन बिले वेळेत दाखल केली जात नव्हती. हा प्रश्न लोकमतने ऐरणीवर आणला. याची वेळीच दखल जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेऊन गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार संजय येरमे यांच्याकडे सोपविण्याचे आदेश दिले. त्यामुळे सातशेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.