मुदखेड नगराध्यक्षांसह दोघांवर ॲट्राॅसिटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:19 AM2021-02-11T04:19:57+5:302021-02-11T04:19:57+5:30
ठेकेदार बजरंग खोडके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजेदरम्यान मुदखेड पालिकेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांना ...
ठेकेदार बजरंग खोडके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजेदरम्यान मुदखेड पालिकेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांना भेटण्यासाठी बजरंग खोडके हे गेले असता नगराध्यक्ष मुजीब जागीरदार यांनी खोडके यांना ‘तू नगर परिषद में क्यू आया, तेरा क्या काम है तेरा यहाँ कूछ होनेवाला नही, यहांसे निकल जा’ यावर खोडके यांनी नगराध्यक्ष जागीरदार यांना सांगितले, मै मुख्याधिकारी को मिलने आया हूं, आपको नही. असे म्हणताच मुजीब जागीरदार यांनी बजरंग खोडके यांना गळा धरून जातीवाचक शिवीगाळ करीत मला जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच सलाम व नगराध्यक्षांच्या ड्रायव्हरने मारहाण केली, असे पोलिसात दिलेल्या तक्रारीत नोंद झाली आहे.
बजरंग खोडके यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुजीब जागीरदार, सलाम तसेच ड्रायव्हर या तिघांवर मुदखेड पोलिसात ॲट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी बाळासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश शर्मा करीत आहेत. मुदखेड शहरात एकाच आठवड्यात दुसरा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.