लिंग भेदभावामुळे स्त्रियांवर स्त्री म्हणून अत्याचार -रेणुका तमलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:53 AM2021-01-08T04:53:14+5:302021-01-08T04:53:14+5:30

श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात जेंडर सेन्सिटिव्हिटी सेलच्या वतीने प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार ...

Atrocities on women as women due to gender discrimination -Renuka Tamalwar | लिंग भेदभावामुळे स्त्रियांवर स्त्री म्हणून अत्याचार -रेणुका तमलवार

लिंग भेदभावामुळे स्त्रियांवर स्त्री म्हणून अत्याचार -रेणुका तमलवार

Next

श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात जेंडर सेन्सिटिव्हिटी सेलच्या वतीने प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार झूम ऑनलाइन व्याख्यानात ‘लिंग भेदभाव : एक सामाजिक समस्या’ या विषयावर त्या बोलत होत्या.

तमलवार म्हणाल्या, स्त्रियांना कौटुंबिक व सामाजिक जीवनात छोट्या-छोट्या बाबींसंदर्भातही निर्णय घेण्याचा अधिकार नाही. समाजात समता व न्याय प्रस्थापित करावयाचा असल्यास समाजसुधारकांच्या विचारानुसार आचरण करणे गरजेचे आहे. हॉटेलमध्ये काम करणारा, स्वयंपाक करणारा पुरुष घरात काम करत नाही; कारण घरात काम करण्याचे पैसे मिळत नाहीत. स्त्रियांनी एकमेकींना आधार दिल्यास त्यांच्या समस्यांचे निराकरण होईल. याप्रसंगी राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. अजय गव्हाणे यांनी मनोगत व्यक्त केले.

सूत्रसंचालन प्रा.डॉ. कविता सोनकांबळे यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रा. डॉ. मंगल कदम यांनी करून दिला, तर आभार उर्दू विभागप्रमुख प्रा. डॉ. शबाना दुर्राणी यांनी मानले. यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. उत्तम सावंत, प्रा. डॉ. एल. व्ही. पद्मा राव, प्रा. डॉ. मीरा फड, प्रा. गौतम दुथडे, प्रा. डॉ. नीता जयस्वाल, प्रा.डॉ. अंजली गोरे, प्रा. डॉ. संगीता शिंदे- ढेंगळे, संदीप पाटील आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Atrocities on women as women due to gender discrimination -Renuka Tamalwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.