पोलिसांवरील हल्ला दुर्दैवी; दोषींविरुद्ध कठोर कारवाई करू : पालकमंत्री अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:18 AM2021-03-31T04:18:19+5:302021-03-31T04:18:19+5:30

कोरोनाची स्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेतर्फे हल्लाबोल कार्यक्रम होऊ नये यासाठी चर्चा करून कार्यक्रम न करण्याचा ...

Attack on police unfortunate; We will take strict action against the culprits: Guardian Minister Ashok Chavan | पोलिसांवरील हल्ला दुर्दैवी; दोषींविरुद्ध कठोर कारवाई करू : पालकमंत्री अशोक चव्हाण

पोलिसांवरील हल्ला दुर्दैवी; दोषींविरुद्ध कठोर कारवाई करू : पालकमंत्री अशोक चव्हाण

Next

कोरोनाची स्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेतर्फे हल्लाबोल कार्यक्रम होऊ नये यासाठी चर्चा करून कार्यक्रम न करण्याचा निर्णय झाला होता. पोलीस प्रशासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत बाबाजींनी सहकार्य करण्याचा शब्द दिला होता. तथापि, हल्लाबोल मिरवणुकीमध्ये काही समाज कंटकांनी पोलिसांवर हल्ल्याचे जे कृत्य केले, त्या दोषी लोकांविरुद्ध शासनातर्फे कठोरातील कठोर कारवाई करू, असे पालकमंत्री चव्हाण यांनी सांगितले. या हल्ल्यातील जखमी पोलिसांची त्यांनी आस्थेने विचारपूस करून त्यांना ज्या वैद्यकीय सुविधा लागतील त्या तत्काळ पुरविण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.

मंगळवारी डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे त्यांनी कायदा व सुव्यवस्थाबाबत वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन त्यांनी आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विशेष पोलीस महानिरिक्षक निसार तांबोळी, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांची उपस्थिती होती.

0000

Web Title: Attack on police unfortunate; We will take strict action against the culprits: Guardian Minister Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.