सुनेचा सासूला मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:17 AM2021-05-19T04:17:57+5:302021-05-19T04:17:57+5:30

कामजळगा येथे घरफोडीची घटना मुखेड तालुक्यातील कामजळगा येथे चोरट्यांनी घर फोडून १ लाख ३४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ...

Attempt to kill Sune's mother-in-law | सुनेचा सासूला मारण्याचा प्रयत्न

सुनेचा सासूला मारण्याचा प्रयत्न

googlenewsNext

कामजळगा येथे घरफोडीची घटना

मुखेड तालुक्यातील कामजळगा येथे चोरट्यांनी घर फोडून १ लाख ३४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना १० मे रोजी घडली. ओमप्रकाश बाबूराव सिद्धेश्वर हे त्यांच्या बहिणीच्या गावी गेले होते. ही संधी साधून चोरट्याने कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. यावेळी घरातील ९४ हजार रुपयांचे दागिने आणि रोख ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. या प्रकरणात मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जिल्ह्यात पाच दुचाकी चोरीला

जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून सोमवारी तब्बल पाच गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. दररोज साधारणत: चार ते पाच दुचाकी जिल्ह्यातून चोरीला जात आहेत.

तरोडा खु. भागात किशन शंकरराव कल्याणकर यांची एम.एच.- २६ ए.एच.- ७२०२, हिमायतनगर शहरातील जनता कॉलनीत दशरथ अमृतराव दळवे एम.एच.- २६, बी.एफ.- ३९१८, नांदेड ग्रामीणमध्ये गुरदीपसिंघ रायके यांची एम.एच.- २६ बी.एस.- १८०२, विमानतळ हद्दीत मधुकर भरत डोकाेरेंची एम.एच.-२६ ए.पी.- ९९०५ तर कंधार पोलीस ठाण्याच्या हद्दीत उद्धव केरबा यांची एम.एच.- २६ ए.पी.- २४२८ या क्रमांकाची दुचाकी लांबविण्यात आली आहे.

तरुणावर केला तलवारीने हल्ला

हस्सापूर शिवारात एका तरुणावर तलवारीने हल्ला करण्यात आला. ही घटना १४ मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. उजेद महेबूबखान हे लग्न मंडप सजावटीचे काम करतात. १४ मे रोजी ते मित्रासाेबत फोटो आणण्यासाठी गेले होते. हस्सापूर ब्रीजवर आरोपींनी त्यांना अडविले. माझ्या शत्रूबरोबर का फिरतोस असे म्हणून त्यांनी उजेद यांच्यावर तलवारीने हल्ला केला. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अनुदान उचलले म्हणून मारहाण

कंधार तालुक्यातील कौठा येथे एका शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली. ही घटना १७ मे रोजी घडली. खय्यूम रज्जाक मुल्ला हे मारुती मंदिराजवळ थांबलेले असताना आरोपी त्या ठिकाणी आले. यावेळी शेतीवर आलेले अनुदान का उचलले, म्हणून त्यांनी मुल्ला यांच्याशी वाद घातला. त्यानंतर मारहाण केली. या प्रकरणात कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Attempt to kill Sune's mother-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.