लोकशाहीची लावली बोली ! पारावर बसून गावकऱ्यांनी केला उपसरपंचपदाचा लिलाव; साडेदहा लाखांत झाली विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 05:15 PM2020-11-25T17:15:44+5:302020-11-25T17:19:59+5:30

सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे तालुक्यातील प्रत्येक गावात राजकारण तापायला सुरुवात झाली आहे

auction of democracy! The villagers auctioned the post of Sub-Sarpanch sitting on Para; Sales were in the 10.5 millions | लोकशाहीची लावली बोली ! पारावर बसून गावकऱ्यांनी केला उपसरपंचपदाचा लिलाव; साडेदहा लाखांत झाली विक्री

लोकशाहीची लावली बोली ! पारावर बसून गावकऱ्यांनी केला उपसरपंचपदाचा लिलाव; साडेदहा लाखांत झाली विक्री

Next
ठळक मुद्देउपसरपंचपदाच्या बोलीची सुरुवात ७ लाख १ हजार रुपये ठेवण्यात आली होती. गावांमध्ये तर चक्क सरपंच, उपसरपंचपद विक्री केले जात आहे.

बारड (जि.नांदेड) : महाटी, ता.मुदखेड येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या असून, ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षणही  जाहीर झाले आहे. यात महाटी गावाचे सरपंचपद ओबीसी प्रवर्गाला राखीव सुटले. त्यामुळे उपसरपंचपदासाठी बोली लावली होती. यामध्ये उपसरपंचपद तब्बल दहा लाख पन्नास हजार रुपयांमध्ये विक्री करण्यात आल्याची माहिती आहे.

नांदेड जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे तालुक्यातील प्रत्येक गावात राजकारण तापायला सुरुवात झाली असून, काही गावांमध्ये तर चक्क सरपंच, उपसरपंचपद विक्री केले जात आहे.  महाटी येथील गावकऱ्यांनी उपसरपंचपदासाठी शनिवार रात्री आठ वाजता मारुती मंदिराच्या बाहेरील ओट्यावर गावकरी मंडळी एकत्रित जमा झाली. या ओट्यावर एक बैठक घेऊन   बैठकीमध्ये उपसरपंचपदासाठी ज्यांना उभं राहायचं आहे, निवडणूक लढवायची आहे त्यांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार गावातील विद्यमान सरपंच प्रतिनिधी बळीराम पाटील ढगे, सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी व्यंकटराव मारोतराव ढगे, माजी सरपंच माधवराव तानाजी ढगे यांनी या बोलीत सहभाग घेतला होता. 

उपसरपंचपदाच्या बोलीची सुरुवात ७ लाख १ हजार रुपये ठेवण्यात आली होती. त्यानुसार बळीराम ढगे, व्यंकटराव ढगे, मारोतराव ढगे यांनी बोली लावली. अखेर १० लाख ५० हजारांची ही बोली माधवराव ढगे यांनी लावली. त्याला गावकऱ्यांनी हिरवा कंदिल दाखविला. शेवटची बोली लावणारे माधवराव ढगे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला  असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

बोली लावलेली खरी आहे. यातून मिळणाऱ्या पैशातून गावातील शाळेसाठी डिजिटल खोल्या बनवण्याचा मानस होता. हा पैसा शाळा सुधारण्यासाठी वापरण्यात येणार होता 
- बळीराम ढगे, बोलीत सहभागी

Web Title: auction of democracy! The villagers auctioned the post of Sub-Sarpanch sitting on Para; Sales were in the 10.5 millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.