स्वयंचलित हवामान केंद्र नावालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:33 AM2018-02-25T00:33:42+5:302018-02-25T00:33:48+5:30
शेतक-यांना नैसर्गिक आपत्तीपासून रक्षण मिळावे यासाठी शासनाने स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ८० मंडळात हे हवामान केंद्र स्थापन करण्यात आले़ शेतक-यांचे होणारे नुकसान टाळता यावे व हवामानाची अचूक माहिती मिळावी, यादृृष्टीने हे केंद्र शेतक-यांसाठी आधार देणारे आहेत़ अवेळी पडणारा पाऊस, गारपीट तसेच वादळी वा-यामुळे शेतक-यांच्या तोंडचा घास निसर्ग हिरावून घेतो़ अशावेळी या केंद्राचा फारसा उपयोग होताना दिसत नाही़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्ह्यातील शेतक-यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळावा यासह वातावरणातील बदलामुळे होणारे शेतीचे संभाव्य नुकसान टाळता यावे, या उद्देशाने शासनाच्या वतीने स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ८० महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्यात आले आहेत. परंतु, या हवामान केंद्रांचा शेतक-यांना फारसा लाभ होताना दिसत नसल्याच्या प्रतिक्रिया शेतक-यांतून ऐकावयास मिळत आहेत.
दिवसेंदिवस सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल जाणवत आहे. त्यामुळे अवेळी पडणारा पाऊस, गारपीट यासह अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान होत असल्याने शेतक-यांना अनेकवेळा आर्थिक फटका सहन करावा लागतो. शेतकºयांचे होणारे नुकसान टाळता यावे व हवामानाची अचूक माहिती मिळावी, यासाठी शासनाने स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील ९ महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र तयार करण्यात आले आहेत. तर मुदखेड-४, अर्धापूर-४, कंधार-६, लोहा-६, देगलूर-६, मुखेड तालुक्यात-७, बिलोली- ५, धर्माबाद-३, नायगाव- ५, किनवट तालुक्यात - ७, माहूर- ४, भोकर- ४, हिमायतनगर- ३, हदगाव- ७ तर उमरी तालुक्यातील ३ महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
एकीकडे प्रशासन स्वयंचलित हवामान केंद्राआधारे शेतकºयांना हवामानाचा अंदाज देणारी माहिती मोबाईलद्वारे दिली जात असल्याचा गवगवा करीत आहे. तर दुसरीकडे शेतकरी मात्र या केंद्रांबाबत अनभिज्ञ असल्याचे चित्र जिल्ह्यातील बहुतांश भागात दिसून येत आहे. विशेष म्हणजे, अनेक भागांतील शेतकºयांना त्यांच्याच गावातील स्वयंचलित हवामान केंद्राची माहिती नसल्याची बाब ‘लोकमत’ चमूने घेतलेल्या माहितीआधारे समोर आली आहे.
४शेतकरी स्वयंचलित हवामान केंद्रांबाबत अनभिज्ञ असल्याचे चित्र जिल्ह्यातील बहुतांश भागात दिसून येत आहे. विशेष म्हणजे, अनेक भागांतील शेतकºयांना त्यांच्याच गावातील स्वयंचलित हवामान केंद्राची माहिती नसल्याची बाब ‘लोकमत’ चमूने घेतलेल्या माहितीआधारे समोर आली आहे.
४ निसर्गाचा कोप झाला तर तोंडाशी आलेले पीक क्षणार्धात नष्ट होते़ त्याची नुकसान भरपाईसुद्धा पुरेशी मिळत नाही़
हवामान यंत्र बनले शोभेची वस्तू
बारुळ : बारुळ मंडळ महसूल अंतर्गत बारुळ (कॅम्प) येथे हवामान यंत्र बसवून एक वर्षाचा कालावधी होऊनही ते कार्यािन्वत न झाल्याने हे हवामान यंत्र एक शोभेची वस्तू बनले आहे़ बारुळ मंडळ महसूल ंतर्गत २० गावे आहेत़ त्यात कौठा, मंगलसांगवी, चिंचोली, वरवंट, काटकळंबा, हाळदा, चिखलीसह आदी गावे असून महसूल मंडळातंर्गत एकूूण क्षेत्र १३ हजार ४४ हेक्टर आहे़ या मंडळाअंतर्गत शेतकºयांच्या हितासाठी प्रशासनाने हवामान यंत्र बसविले; पण ते अजूनही सुरु झाले नाही़ त्यामुळे हे हवामान यंत्र एकप्रकारे शोभेची वस्तू बनले आहे़ त्यामुळे शेतक-यांना अनंत अडचणीला सामोरे जावे लागत आहे़ पाऊस, अवकाळी वादळ वारे, गारपीट, विजा याचा अंदाज लागत नाही़ शेतक-यांचे आर्थिक व जीवितहानीचे प्रमाण वाढले आहे़ यंत्र बारुळ कॅम्प येथे बसविण्यात आले़ पण सद्य:स्थितीत ते सुरु झाले नाही़ त्यामुळे गैरसोय होत आहे. हे यंत्र मागीलवर्षी बसविण्यात आले होते़