ऑटोरिक्षा चालकांच्या अनुदान वाटपाचे काम अंतिम टप्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:17 AM2021-04-24T04:17:53+5:302021-04-24T04:17:53+5:30
राज्यातील ७ लाख १५ हजार परवानाधारकाना प्रत्येकी १ हजार ५०० रुपये प्रमाणे १०७ कोटी रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार ...
राज्यातील ७ लाख १५ हजार परवानाधारकाना प्रत्येकी १ हजार ५०० रुपये प्रमाणे १०७ कोटी रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. ही रक्कम संबंधितांनच्या बँक खात्यात थेट आभासी पध्दतीने जमा करण्यात येणार आहे. या करिता परिवहन विभागामार्फत आभासी प्रणाली विकसित करण्यात येत असून त्यामध्ये परवानाधारक ऑटोचालकाना आपले आधार क्रमांक ,वाहान क्रमांक, लायसन्स,परमिट, यांची नोंद करावी लागणार आहे. खातरजमा झाल्यानंतर आधार क्रमांकाशी जोडणी असलेल्या बँक खात्यांमध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. परिवहन विभागामार्फत आँनलाईन प्रणाली विकसीत करण्यात येत आहे या प्रणालीची माहिती विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार असून तत्पूर्वी ऑटो परवानाधारकानी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी जोडून घ्यावे असे आवाहन परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे व टायगर ऑटोरिक्षा संघटना जिल्हा अध्यक्ष अहेमद (बाबा) बागवाले यांनी केले.