अस्वलाच्या भीतीने अंबाडीकरांचे जागरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:33 AM2019-01-23T00:33:59+5:302019-01-23T00:35:49+5:30

तालुक्यातील मोठ्या लोकवस्तीचे अंबाडी गाव. या गावच्या तिन्ही बाजूनी जंगल. या गावातील लोकांनी कधीही असे हिंस्त्र प्राणी प्रत्यक्षात गावांत आलेले पाहिले नाही. सोमवारी रात्री मात्र अस्वल पाहण्याचा त्यांना योग आला. लहान मुलांसह वृद्धही अस्वलाला पाहण्यासाठी तोबा गर्दी करून बसले.

Awakening fear of Aswala, Awakening awake | अस्वलाच्या भीतीने अंबाडीकरांचे जागरण

अस्वलाच्या भीतीने अंबाडीकरांचे जागरण

Next
ठळक मुद्देप्रत्यक्ष गावात आले अस्वल कोणी म्हणे पाण्याच्या शोधात आले तर कुणी म्हणे मानवावर हल्ला करण्यासाठी !

गोकुळ भवरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
किनवट : तालुक्यातील मोठ्या लोकवस्तीचे अंबाडी गाव. या गावच्या तिन्ही बाजूनी जंगल. या गावातील लोकांनी कधीही असे हिंस्त्र प्राणी प्रत्यक्षात गावांत आलेले पाहिले नाही. सोमवारी रात्री मात्र अस्वल पाहण्याचा त्यांना योग आला. लहान मुलांसह वृद्धही अस्वलाला पाहण्यासाठी तोबा गर्दी करून बसले. मोबाईलचा जमाना असल्याने कोणीतरी मोबाईलवरून वनविभागाला व पोलिसांना आमच्या गावांत अस्वल आले आहे, तुम्ही लवकर या असा मेसेज केला अन् मग काय पळापळ सुरू झाली. पोलीस वनविभागाने विचार केला कसेही करून अस्वलाला अंबाडी गावातून घेऊन जायचे किंवा पळवून लावायचे. अन २१ जानेवारीच्या रात्री १२.२० वाजता यात ते यशस्वी झाले़
सहाय्यक वनसंरक्षक डॉ. राजेंद्र नाळे म्हणाले, या परिसरात जंगल जास्त असून बोराचे झाडेही गावालगतच्या शेतात मोठया प्रमाणावर आहेत माणसाप्रमाणे अस्वलालाही बोरं जास्त आवडतात त्यामुळे तो बोरं खाण्यासाठी गावांत आले असावे म्हणत त्यांनी गावकऱ्यांचे तर्कवितर्क बंद करून तुम्ही इथून जा अस्वल खूप मोठे आहे तो माणसावर चाल करू शकतो, असे वनकर्मचारी गावकºयांना वारंवार म्हणून आवाहन करत होते
रात्रीचे पावणेबारा होत आले होते अस्वल पिंजºयातही येईना आणि जाळीतही अडकेना, आता काय करावे?अस्वलाला कसे पकडावे? अस्वलाला पकडले नाही तर नामुष्की होईल म्हणून वनविभाग व पोलीस विभाग चिकाटीने प्रयत्न करून होते रात्र गेली तरी चालेल अस्वलाला अंबाडीतून घेऊन जायचे किंवा पळवून लावायचे असा मनाशी विचार केला. अंबाडी गावांत अस्वल थांबले त्या स्थळाला सोमवारी रात्री छावणीचे स्वरूप आले होते घटनास्थळाच्या आजू बाजूला जिकडे बघावे तिकडे वनविभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी दिसत होते गावातील सर्व लहान, वृद्ध बालके कुपाटीजवळ गोळा होऊन अस्वलाला बघत होते. वनविभागाचे अधिकारी- कर्मचारी अस्वल मोठा आहे इथे कोणीही थांबू नका सर्वजण इथून जा, असे सांगत होते. पण अस्वल पाहण्याचा मोह दाटलेले बघे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतेच, अशातच पोलीस अधिकारी व कर्मचारी येताच बघ्यांनी तेथून धूम ठोकली अन् तेव्हा कुठे अस्वलाला पळवून लावता आले.
एक पळाला तर दुसरे अस्वल दबा धरुन बसले
किनवट- मांडवी रस्त्यावर जंगलाच्या शेजारी अंबाडी गाव. रात्री नऊ वाजता रस्त्याच्या बाजूला तरुण मुले गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात त्यांना गावालगतच्या शेतातून गावाच्या दिशेने येणारे दोन जंगली अस्वल दिसले.मुलांना पाहताच एक अस्वल परत शेताच्या दिशेने गेले तर एक अस्वल चक्क गावात घुसले एका घराच्या कुपाट्या शेजारी जाऊन बसले. पौर्णिमेचा दिवस, रात्री चंद्राचा पांढराशुभ्र प्रकाश तोच क्षणाचाही विचार न करता गावातील लहानमोठ्यांच्या कानावर ही गोष्ट गेली अन् मग काय बघता बघता वाºयासारखी ही बातमी पसरल्याने आणि सारे गावच अस्वलाला पाहण्यासाठी गोळा झाले एका कुपट्याजवळ अस्वल दबा धरून बसले होते रात्र अन् सर्वांच्या हातात बॅटºया कोणी म्हणे अस्वल पाण्याच्या शोधात तर कोणी म्हणे माणसावर हल्ला करण्यासाठी आले.
पळशीत जेरबंद झाला अस्वल
मांडवी : सकाळी चहापाण्याची वेळ, अशात पळापऴ अस्वल आला या आवाजाने जो तो घराबाहेर पडला़ नाल्याकडून गावात शिरलेले अस्वल चक्क एका गोठ्यात घुसले अन् बघता बघता चांगलीच गर्दी जमली़ दबा धरून बसलेल्या अस्वलाला पाहण्यासाठी हातात काठी-गोटा घेवून जो तो पुढे करीत होते़ ही घटना पळशी येथे मंगळवारी घडली़ वन विभागाने पिंजरा लावून त्या जखमी अस्वलाला गावाबाहेर घेवून गेले़
अस्वलाच्या तोंडातून रक्तस्त्राव सुरु होता. एका पायाची नखे कुरतडलेली होती. अस्वल जखमी कसे झाले? हे मात्र कळू शकले नाही. विशेष म्हणजे, अस्वलाने कुणावरही हल्ला केला नाही. गावात अस्वल घुसल्याची माहिती गावचे पोलीस पाटील उत्तम लढे यांनी वनविभागास दिली़ मांडवीचे क्षेत्राधिकारी अविनाश तायनाक यांनी आपल्या ताफ्यासह पळशी येथे दाखल झाले़ नरसिंग अबडवार यांच्या गोठ्यात आश्रय घेतलेल्या अस्वलास लोखंडी जाळीचा पिंजरा लावून बाहेर काढले़ तेथून त्यास राजगड येथे नेण्यात आले़ याकामी डॉ़राजेंद्र नाळे, अविनाश तायनाक, वनपाल मधुकर राठोड, राहुल शेळके, शेख फरीद, एम़एफ़ काजी, संतवाले, गमे पाटील, आ़डी़ चव्हाण इ़ वन कर्मचारी सहभागी झाले़ येथे कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी मांडवी ठाण्याचे सपोनि संतोष केंद्रे, विजय कोळी आदी पोलीस कर्मचारी येथे हजर होते़ गावातील संजय रेड्डी, सुदर्शन सुरगुंडवार, सरपंच आनंद कनाके, रामदास सोनुले नामदेव पेटकुले, पार्थरेड्डी, विकास पाटील, पोलीस पाटील आदी उपस्थित होते़

Web Title: Awakening fear of Aswala, Awakening awake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.