कासलोड यांना पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:12 AM2020-12-07T04:12:17+5:302020-12-07T04:12:17+5:30
रमेश केंद्रे यांना निरोप नांदेड - शासकीय आयटीआय प्रशिक्षण संस्थेतील गट निदेशक रमेश केंद्रे सेवानिवृत्त झाल्याने त्यांना एका कार्यक्रमात ...
रमेश केंद्रे यांना निरोप
नांदेड - शासकीय आयटीआय प्रशिक्षण संस्थेतील गट निदेशक रमेश केंद्रे सेवानिवृत्त झाल्याने त्यांना एका कार्यक्रमात निरोप देण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, संस्थेचे प्राचार्य एम. डी. कुलकर्णी, उपप्राचार्य प्रा. एस. एस. परघणे, प्रबंधक वाय. बी. राठोड, प्राचार्य एम. एस. बिराजदार, प्रा. गुरुबचनसिंघ, प्रा. पांडुरंग तिडके, विद्यापीठाचे वित्त अधिकारी गोविंदराव कतलाकुट्टे उपस्थित होते.
दोन एकर ऊस जळाला
माळाकोळी : शेतातून गेलेल्या विद्युत तारांच्या घर्षणामुळे आग लागून दोन एकर ऊस जळाल्याची घटना माळेगाव येेथे शनिवारी घडली. सतीश धुळगुंडे यांचा ऊस होता. आगीत सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. तलाठी निकम यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.
तालुकाध्यक्षपदी गजले
लोहा : बहुजन भारत पार्टीच्या लोहा तालुकाध्यक्षपदी रंगनाथ गजले यांची जिल्हाध्यक्ष साहेब गुंडले यांनी निवड केली. यावेळी बी. एस. गजले, अश्विनी कोरे, अरुण गऊळकर आदी उपस्थित होते. पार्टीच्या वतीने गजले यांचा सत्कार करण्यात आला.
वारसांना धनादेश वाटप
मुदखेड : सहकारी पतपेढी शिक्षण विभागाच्या काही सभासदांचे निधन झाले. त्यांचे वारसदार सविता शेट्टीवार, मंजुळा गुट्टे, कल्पना डवरे यांना पतसंस्थेकडून प्रत्येकी दोन लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नीळकंठ चोंडे, उपाध्यक्ष बाबूराव फजगले, सचिव मधुकर उन्हाळे, संचालक संजय कोठाळे, अशोक पवळे, दत्तात्रय पांडागळे, व्यंकट गंदपवार, जयश्री भरडे, जीवनराव वडजे, बाबूराव कैलासे आदी उपस्थित होते.
कुरुडे यांच्या शाळांना भेटी
कंधार : नुकत्याच शाळा सुरू झाल्या. या पार्श्वभूमीवर शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डॉ. केशवराव धोंडगे व सचिव माजी आ.गुरुनाथ कुरुडे यांनी संस्थेच्या विविध शाळांना भेटी देऊन पाहणी केली. यामध्ये शहरातील श्री शिवाजी हायस्कूल, शिवाजी विद्यामंदिर, शिवाजी विधी महाविद्यालय, शिवाजी विद्यालय सोनखेड, संत गाडगे महाराज विद्यालय लोहा आदींचा समावेश आहे.
माकपचे शिबिर
किनवट : मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे दोन दिवसीय जिल्हा शिबिर किनवट येथे सुरू झाले. जिल्हा सचिव शंकर सिडाम यांनी प्रास्ताविक केले. शिबिरात विनोद गोविंदवार, विजय गाभणे यांनी मार्गदर्शन केले. शिबिरामध्ये ४९ सभासदांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाला उज्ज्वला पडलवार, किशोर पवार, गंगाधर गायकवाड, प्रल्हाद चव्हाण, जनार्दन काळे, शैला आडे आदी उपस्थित होते.
दिव्यांग दिन साजरा
फुलवळ : जागतिक अपंग दिनानिमित्त प्रहार जनशक्ती व गावकऱ्यांच्या वतीने दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी रामराव मंगनाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून गफार शेख, सादिक शेख, अखिल बिच्चू, मगदुम शेख, विकास जाधव, विठ्ठल जाधव, हणमंत जाधव, मुक्तेश्वर मंगनाळे उपस्थित होते. यावेळी उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला माजी सरपंच बालाजी देवकांबळे, प्रहारचे तालुकाध्यक्ष प्रवीण मंगनाळे, कामाजी मंगनाळे, आनंदराव पवार, नागेश सादलापुरे, उमाकांत मंगनाळे, जिलानी शेख, रमजान शेख, इसाक शेख, संदीप मंगनाळे, दीपक हाते उपस्थित होते.
देगलुरात जल्लोष
देगलूर : सतीश चव्हाण यांच्या निवडीनंतर देगलूरमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी माजी आ.सुभाषराव साबणे, पं.स. सभापती संजय वलकले, माजी सभापती शिवाजीराव देशमुख, राष्ट्रवादीचे लक्ष्मीकांत पदमवार, जितेश अंतापूरकर, मारोतराव देशमुख, बालाजी थडके, नगरसेवक माळेगावकर, जनार्दन बिराजदार, चंद्रकांत मोरे, संजय जोशी, पिंटू जोशी, बंडू पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाध्यक्षपदी नारेवाड
हदगाव : कोळी समाज संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी तामसा येथील माजी सरपंच माधवराव नारेवाड यांची परभणी येथे झालेल्या बैठकीत निवड करण्यात आली. बैठकीला अविनाश कोळी, निवृृृृृृत्ती रेखगेवाड, रमेश पिटलेवाड आदी उपस्थित होते. निवडीबद्दल नारेवाड यांचे अनेकांनी स्वागत केले.