ऑनलाईनच्या माध्यमातून कोरोनाविषयी जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:18 AM2021-03-31T04:18:01+5:302021-03-31T04:18:01+5:30
काव्यपौर्णिमा मालेतील एकोणचाळीसाव्या काव्यपौर्णिमेचे ऑनलाईन उद्घाटन तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करुन प्रज्ञा करुणा ...
काव्यपौर्णिमा मालेतील एकोणचाळीसाव्या काव्यपौर्णिमेचे ऑनलाईन उद्घाटन तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करुन प्रज्ञा करुणा विहार देगावचाळ येथे करण्यात आले. प्रारंभी कवी शरदचंद्र हयातनगरकर यांनी आता आपण कोरोनाचे श्राद्ध घालावयास पाहिजे, अशी भूमिका घेतली, तर शेख अनिसा यांनी होळी आणि रंगधूळ यांच्या संगमातून कोरोनाला जाळून नवयुगाचा रंगोत्सव खेळूया, अशी भावना व्यक्त केली. गंगाधर ढवळे यांनी सहभागी होताना मृत्यू शोधात आहे, जीवनाच्या आणि जीवन मृत्यूकडे प्रवासत चालले आहे, अशा आशयाची कविता सादर केली. बी. सी. पाईकराव यांनीही कोरोना रोखता येईल आणि कायमस्वरूपी आपण त्याला मूठमाती देऊ शकतो, हा आशावाद व्यक्त केला. ग्रामीण कवी नागोराव डोंगरे यांनी होळी पेटवूया कोरोनाची, ही गेय कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रास्ताविक गंगाधर ढवळे यांनी केले. बी. सी. पाईकराव यांनी आभार मानले. कार्यक्रम ऑनलाईन प्रसारित करण्यासाठी मंडळाचे पांडुरंग कोकुलवार, कैलास धुतराज, मारोती कदम, शंकर गच्चे, प्रशांत गवळे, रुपाली वैद्य वागरे यांनी परिश्रम घेतले.