किनवट, माहुरात आरोग्यसेवेचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 12:12 AM2018-01-06T00:12:08+5:302018-01-06T00:12:13+5:30
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची पदे रिक्त आहेत़ केवळ एकाच वैद्यकीय अधिकाºयावर सहा प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार चालवला जात असल्याचे भयानक चित्र आहे़ माहूर तालुक्याची स्थितीही यापेक्षा काही वेगळी नाही़ आरोग्य विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
किनवट : तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची पदे रिक्त आहेत़ केवळ एकाच वैद्यकीय अधिकाºयावर सहा प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार चालवला जात असल्याचे भयानक चित्र आहे़ माहूर तालुक्याची स्थितीही यापेक्षा काही वेगळी नाही़ आरोग्य विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे़
किनवट तालुक्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे ९ प्राथमिक केंद्र असून ६५ आरोग्य उपकेंद्र आहेत़ तसेच एक नागरी दवाखाना आहे़
रुग्णांसाठी प्रत्येकी दोन वैद्यकीय अधिकाºयांची नेमणूक असताना बोधडी, जलधरा, इस्लापूर वगळता अन्य सहा आरोग्य केंद्रात केवळ एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे़ दिवसरात्र सेवा देण्याचे काम एकच वैद्यकीय अधिकारी करतात़ रिक्त व प्रतिनियुक्ती आरोग्य कर्मचाºयांचीही वाणवा आहे़ रिक्त पदांमुळे आरोग्याशी संबंधित विविध समस्या आहेत़
एकीकडे शासन बालमृत्यू, कुपोषणमुक्ती कमी करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करीत असताना दुसरीकडे उपरोक्त भयानक चित्र पहावयास मिळते़ संबंधित विभागाने याकडे लक्ष देवून रिक्त पदे भरावीत, अशी मागणी पं़ स़ सदस्य नीळकंठ कातले यांनी केली़ आजघडीला शिवणी, अप्पारावपेठ, मांडवी, उमरी बाजार, दहेलीतांडा, राजगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ एकच डॉक्टर असून चार पदे रिक्त आहेत तर दोन गैरहजर अशी परिस्थिती असल्याचेही कातले यांनी सांगितले़
कर्मचाºयांची रिक्त पदे भरावीत, प्रतिनियुक्त्या रद्द कराव्यात अन्यथा २५ जानेवारी रोजी बेमुदत उपोषण करण्यात येईल, असेही कातले यांनी सांगितले़
श्रीक्षेत्र माहूर : तालुक्यात सहा वैद्यकीय अधिकाºयांवर आरोग्य विभागाचा भार आहे़ चार वैद्यकीय अधिकाºयांच्या जागा रिक्त असल्याने तालुक्यातील आरोग्य सेवाच सलाईनवर आहे.
माहूर शहरात ग्रामीण रुग्णालय आहे़ तर वानोळा, इवळेश्वर, आष्टा, वाई बा़, सिंदखेड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे़ शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दोन वैद्यकीय अधिकारी नियुक्तीला मंजुरी आहे़ सध्या सिंदखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत़ वानोळा, ईवळेश्वर, आष्टा, वाई बा़ येथे प्रत्येकी एक वैद्यकीय अधिकाºयाचे पद रिक्त आहे़ या चार ठिकाणी एकाच वैद्यकीय अधिकाºयावर भार पडत आहे़ वर्ग- ३ व वर्ग- ४ ची पदे सुद्धा रिक्त आहेत.
रिक्त पदे- तालुक्यातील पाच आरोग्य केंद्रात मलेरिया विभागातील आष्टा १, कुपटी १, सेलू १ असे एकूण तीन पदे रिक्त आहेत़ वानोळा, सिंदखेड, इवळेश्वर, आष्टा येथील वाहनचालकांची प्रत्येकी १ असे एकूण ४ पदे रिक्त आहेत़ वानोळा १, सिंदखेड १ असे एकूण दोन प्रयोगशाळा तंत्रज्ञ तर परिचरची सात पदे रिक्त आहेत़
उपकेंद्राची इमारत धूळखात
मागील पाच वर्षांपूर्वीच वानोळा आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले़ मात्र इमारतीचे हस्तांतरण न झाल्याने धूूळखात आहे.
सध्या तालुक्यात कुठेही साथरोग नाही़ तालुक्यात लसीकरण शिबिरे, तपासणी कार्यक्रम सुरू आहेत़ आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा, असे आवाहन आरोग्य कर्मचारी घरोघर जावून करीत आहेत़ रिक्त डॉक्टर व कर्मचाºयांची पदे भरण्यासाठी वरिष्ठ कार्यालय आणि अधिकारी यांच्याकडे अहवाल पाठविला आहे -डॉ़ साहेबराव भिसे, तालुका आरोग्य अधिकारी, माहूऱ