बँक कर्मचाऱ्यांना प्राधान्याने कोरोना लस द्यावी - राजश्री पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:16 AM2021-03-20T04:16:58+5:302021-03-20T04:16:58+5:30
देशात गतवर्षाच्या मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने सर्व व्यवस्था कोलमडून पडली असताना आणि सगळीकडे लॉकडाऊन लावण्यात आल्यानंतर सर्व ...
देशात गतवर्षाच्या मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने सर्व व्यवस्था कोलमडून पडली असताना आणि सगळीकडे लॉकडाऊन लावण्यात आल्यानंतर सर्व सरकारी यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सज्ज झाली होती. त्यामध्ये आरोग्य, पोलीस, महसूल, शिक्षण विभाग यांच्या बरोबरीने सर्वच राष्ट्रीयीकृत आणि सहकारी क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांनीसुद्धा अत्यावश्यक सुविधा म्हणून आपली सेवा त्याच ताकदीने बजावली होती आणि आजही ते आपली सेवा बजावत आहेत. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्यात यावी. सलग सहा महिन्यांच्या लॉकडाऊनच्या काळात आर्थिक व्यवहार सुरळीत राहावेत म्हणून सर्वच बँक कर्मचाऱ्यांनी अहोरात्र सेवा दिली आहे. तर काही वेळा सुरक्षा किटचा वापर करत ग्राहकांना घरपोच सेवा दिली व अर्थव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न केले आहेत, असे राजश्री पाटील म्हणाल्या. (वाणिज्य वार्ता)