बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दोन दिवस कामकाज ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:18 AM2021-03-17T04:18:29+5:302021-03-17T04:18:29+5:30
निधन वार्ता राजेश विठ्ठलराव गायकवाड माजी नगरसेवक तथा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी सूतगिरणी पेठशिवणी, ता.पालमचे उपाध्यक्ष यांचे १६ ...
निधन वार्ता
राजेश विठ्ठलराव गायकवाड
माजी नगरसेवक तथा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी सूतगिरणी पेठशिवणी, ता.पालमचे उपाध्यक्ष यांचे १६ मार्च रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. भाजपाचे माजी आमदार कै. विठ्ठलराव पुरभाजी गायकवाड यांचे चिरंजीव होते.
स्वच्छता आवाहनाला प्रतिसाद
नांदेड- मनपा प्रशासनाने केलेल्या स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याच्या आवाहनाला नागरिक कृती समितीने प्रतिसाद दिला आहे. अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आयुक्त डॉ. सुनील लहाने यांची भेट घेऊन शहर स्वच्छतेबाबत चर्चा केली. तसेच मनपा प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य देणार असल्याचे सांगितले. यावेळी प्रा.डॉ. लक्ष्मण शिंदे, डॉ. पुष्पा कोकीळ, के.के. जामकर, बालाजी टिमकीकर आदी उपस्थित होते.
वक्तृत्व स्पर्धा संपन्न
नांदेड- सोनाई प्रतिष्ठाण बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेला प्रतिसाद लाभला. किरण कुलकर्णी, ऋषिकेश ढगे, एल.बी. ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ऋतिका कोटगिरे हिने मानले.
महावितरणतर्फे प्रचार
नांदेड- महावितरणच्या वतीने कृषी ऊर्जा पर्व राबविण्यात येत आहे. या अंतर्गत कंपनीचे संचालक सतीश चव्हाण यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होर्डिंगचे अनावरण करण्यात आले. यावेळी मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर, अधीक्षक अभियंता संतोष वाहने, कार्यकारी अभियंता मोहन गोपुलवाड आदी उपस्थित होते.
संपाला पाठिंबा
नांदेड- युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने पुकारलेल्या संपाला नांदेड येथील कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीने पाठिंबा दिला. बँक, विमा व शासकीय सेवेतील रिक्त जागा भराव्यात. नवे कामगार कायदे रद्द करावेत, जुनी पेन्शन योजना लागू करावी आदी मागण्या समितीचे ना.रा. जाधव, प्रदीप नागापूरकर आदींनी पत्रकात केल्या आहेत.