पीककर्ज देण्यास बँकांचा हात आखडता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:16 AM2021-03-15T04:16:51+5:302021-03-15T04:16:51+5:30
राष्ट्रीयकृत बँकांनी आजपर्यंत जिल्ह्यात एक लाख एक हजार ५६८ खातेदारांना ७६६ कोटी १२ लाखांचे कर्ज वाटप केले. जिल्हा बँकेकडून ...
राष्ट्रीयकृत बँकांनी आजपर्यंत जिल्ह्यात एक लाख एक हजार ५६८ खातेदारांना ७६६ कोटी १२ लाखांचे कर्ज वाटप केले. जिल्हा बँकेकडून ५७ हजार ८४ शेतकऱ्यांना दोन २७७ कोटी ७० लाख, तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ६१ हजार २५४ शेतकऱ्यांना ३८१ कोटी ५१ लाखांचे कर्जवाटप केले. जिल्ह्यात ५६ टक्क्यांनुसार आजपर्यंत खरिपासाठी एकूण एक लाख ६४ हजार ३२९ शेतकऱ्यांना एक हजार १९ कोटी ९६ लाख रुपयांचे कर्जवाटप रब्बीमध्ये एकूण ५५ हजार ५७७ शेतकऱ्यांना ४०५ कोटी ३७ लाख कर्जवाटप केले. दोन्ही हंगामांत ५६.१२ टक्क्यानुसार दोन लाख १९ हजार ९०६ शेतकऱ्यांना १,४२५ कोटी ३३ लाखांचे कर्जवाटप केले. बँकांनी पीककर्ज वाटप करण्यासाठी हात आखडता घेतल्याने, शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.