बरडशेवाळा कालवा फुटला की फोडला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:26 AM2018-01-17T00:26:23+5:302018-01-17T00:26:48+5:30

बरडशेवाळा येथील कॅनाल फुटल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती़ यामागच्या कारणांची आता परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे़ टेलपर्यंत पाणी पोहोचेपर्यंत ४़६ क्यूसेस पाण्याचा प्रवाह असावा लागतो़ मात्र बरडशेवाळा शाखा संपताच ९़० क्यूसेस पाण्याचा प्रवाह करून सोडल्यानेच कॅनॉल फुटल्याची चर्चा शेतक-यांत सुरू आहे़

 Barkseshwar canal bust or broke? | बरडशेवाळा कालवा फुटला की फोडला?

बरडशेवाळा कालवा फुटला की फोडला?

googlenewsNext
ठळक मुद्देसात हजार क्युसेस पाणी गेले वाहून : जबाबदारी घेणार कोण ?

लोकमत न्यूज नेटवर्क
हदगाव : बरडशेवाळा येथील कॅनाल फुटल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती़ यामागच्या कारणांची आता परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे़ टेलपर्यंत पाणी पोहोचेपर्यंत ४़६ क्यूसेस पाण्याचा प्रवाह असावा लागतो़ मात्र बरडशेवाळा शाखा संपताच ९़० क्यूसेस पाण्याचा प्रवाह करून सोडल्यानेच कॅनॉल फुटल्याची चर्चा शेतक-यांत सुरू आहे़
कयाधू शाखा कॅनाल दाती सी़आऱ २ व पैनगंगा नदी या परिसरात असल्याने जमीन सुपीक व काळीची आहे़ यात जमिनीतून कालवा खोदण्यात आला़ ९० कि़मी़ लांबीचे काम झाले़ या दरम्यान उंदीर, घूस, बैलगाड्यांमुळे कॅनॉलचे नुकसान झाले़ दोन्ही बाजूच्या सिमेंटचे अस्तरही अनेक ठिकाणी गायब झाले़ शाखा कालव्याचा संकल्पित विसर्ग १२़२२ क्यूसेस असताना केवळ ९ क्यूसेस पाणी विसर्ग सोडता येतो़ सा. क्र ० ते ३८७२० मीटरपर्यंत ३ क्यूमेस पाणी नाश एच़पी़सी़ जलसेतू व नादुरुस्त अस्तरीकरणातील गळतीमध्ये होतो़ सा. क्र ३८७२० ते ६०२५० मीटरपर्यंतच्या भागात १़५ क्यूमेस पाणी नाश होतो़ त्यामुळे सा. क्र ६०२५० ते ९० हजार मीटरपर्यंतच्या भागात सिंचन चालू असताना कयाधू शाखा कालव्याचा मायनर क्रमांक १ ते ८६ पूर्णत: बंद ठेवावा लागतो़ त्यामुळे पुढील शेतक-यांना पाणीपाळी वेळेत मिळत नाही.
कालवा दुरुस्ती झाली होती शनिवारीच !
४पाणी कालव्यातून सोडताना शेवटपर्यंत (टेल) पोहोचण्यासाठी पाण्याचा प्रवाह ४ क्युसेस व ६ क्युमेसच असावा लागतो़ मात्र ३७ कि़मी़ अंतरानंतर पाण्याचा प्रवाह ९ क्युसेस केला जातो़ त्यामुळे कालवा फुटण्याचा धोका असतो़ कारण काळीची जमीन जोपर्यंत फुगत नाही तोपर्यंत ती पाणी शोषण्यासाठी तयारच होत नाही़ याशिवाय उंदीर, घुशींनी केलेली बिळं बुजवावी लागतात़ मात्र हे कोणी करत नाहीत़ ८ जानेवारी २०१७ रोजी कालवा फुटल्यानंतर या घटनेची माहिती शेतकºयांनी सायंकाळी अधिका-यांना फोनवरून दिली़ दुस-या दिवशी पाणी बंद करण्यात आले़ या दरम्यान ७ हजार क्युसेस पाणी वाया गेले़ विशेष म्हणजे, कालवा जिथे फुटला त्याच्या दुरुस्तीचे काम शनिवारीच झाले.
वाळू, गिट्टीचाच वापर सिमेंटचा अभाव
४रविवारी पाणी सुटले़ मात्र कामात वाळू व गिट्टीचाच वापर करण्यात आला़ सिमेंट वापरलेच नाही, अशी माहिती मजुरांनी दिली़ जिथे भगदाड पडले ते बंद करण्याऐवजी मजुरांनी दुसरीच छिद्रे बुजविल्याने कामाचा धोका वाढला़ १६ डिसेंबर रोजी या शाखेच्या अधिकाºयांनी वरिष्ठांना एक पत्र लिहिले होते़ त्यात कॅनॉलचे काम करावे लागते़ अन्यथा तो फुटू शकतो़ तो फुटल्यास आमची जबाबदारी राहणार नाही, असे त्यांनी त्यात नमूद केले होते़ त्यानंतर १ जानेवारीला काम सुरू करून ३ रोजी संपते़ ४ रोजी पाणी सोडले जाते आणि नंतरचा प्रकार घडतो़ याला काय म्हणावे़ मागील पाच महिन्यात संबंधितांनी काय केले? आॅक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कामाची मागणी का केली नाही, असा सवाल यानिमित्ताने केला जात आहे़

दुरुस्तीवर लाखोंचा खर्च,तरीही कालवा फुटला
४ २०१६-१७ मध्ये कालवा दुरुस्ती कामावर अनुक्रमे १५ लाख, ८ लाख, ६ लाख, ५ लाख, ८ लाख रुपये रुपये खर्च दर्शविण्यात आला़ या कामाचा दर्जा कोणी तपासला? काम होवूनही कालवा फुटला कसा? की मुद्दाम फोडला? असा सवालही केला जात आहे़ यापूर्वी हा कालवा दोनदा फुटला होता़ या कालव्याच्या चिरेबंदी भिंतीलाच छिद्र करून पाण्याचा विसर्ग नाल्यातून रुई बंधारा भरण्यासाठी केला जातो़ एकूणच संबंधित शेतकरी व अधिकाºयांची यामागे मिलीभगत आहे़ काम बघण्यासाठी कोणीही राहत नाही़ कारण कालव्याच्या सुरुवातीपासूनच गळती होत असेल तर समोर पाणी जाणारच कसे,असा सवाल आहे़

Web Title:  Barkseshwar canal bust or broke?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.