अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे ४३ हजार ६१२ विद्यार्थी होणार दहावी पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:18 AM2021-04-24T04:18:00+5:302021-04-24T04:18:00+5:30
बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी परीक्षा महत्त्वाची असते. त्यामुळे बारावीची परीक्षा होणार हे निश्चित आहे. मे महिन्याच्या अखेरीस ...
बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी परीक्षा महत्त्वाची असते. त्यामुळे बारावीची परीक्षा होणार हे निश्चित आहे. मे महिन्याच्या अखेरीस बारावीची परीक्षा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे दहावीचे जे विद्यार्थी त्यांच्या गुणांबाबत समाधानी नसतील, त्यांना गुण सुधारण्याची संधी दिली जाणार आहे. नांदेड जिल्ह्यातून यंदा ४३ हजार ६१२ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी, तर ३२ हजार १८५ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.
चौकट - परीक्षा रद्द केल्यामुळे दहावीचे विद्यार्थी निवांत झाले असले तरी बारावीच्या विद्यार्थ्यांना मात्र परीक्षा द्यावी लागणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. मात्र मेअखेरसुद्धा कोरोनाची लाट अशीच कायम राहिली तर मग कशा घेणार परीक्षा, अशी चिंता विद्यार्थ्यांना भेडवासत आहे. शासनाने मेअखेर परीक्षा होतील, असे सांगितले, तरी वेळापत्रक जाहीर केले नाही. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना नवीन वेळापत्रकाची प्रतीक्षा लागली आहे.
चौकट- वर्षभर अभ्यास केल्यानंतर ऐन परीक्षेच्या तोंडावरच कोरोना संसर्ग वाढला. त्यामुळे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. परीक्षा रद्द केल्यामुळे काही विद्यार्थ्यांचे अभ्यासातील सातत्य कमी झाले असून, काही विद्यार्थ्यांना मात्र अधिक वेळ मिळाला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करून संधीचे सोने करावे. - बाळासाहेब कच्छवे, समुपदेशक, नांदेड