सावधान ! मास्कचे रिसायकलिंगकरून बनवलेल्या मॅट बाजारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2021 18:13 IST2021-10-12T17:45:11+5:302021-10-12T18:13:58+5:30
recycled masks : दिल्ली व राजस्थान येथून हा माल विक्रीसाठी शहरात येत असल्याचे पुढे आले आहे

सावधान ! मास्कचे रिसायकलिंगकरून बनवलेल्या मॅट बाजारात
- सचिन मोहिते
नांदेड : कोरोना काळात ( corona virus) वापरलेल्या मास्कचे रिसायकलिंग करून बनवलेल्या ( the mat made by recycling masks ) मॅट बाजारात विक्रीस आल्याची धक्कादायक बाब शहरात उघडकीस आली आहे. महापालिका पथकाने आयटीआय कॉर्नर येथे अशा परराज्यातील व्यापाऱ्यांवर कारवाई केली असून त्यांनी विक्रीस आणलेल्या मॅट जप्त केल्या आहेत.
शहरातील चौका चौकांमध्ये मास्कपासून बनविण्यात आलेल्या पायपुसणीची सर्रासपणे विक्री सुरू आहे. शहरात परराज्यातून आलेले काही व्यापारी या पायपुसणी विक्री करत होते. वापरलेल्या मास्कपासून बनवलेल्या छोट्या मॅटची (पायपुसणी) सर्रासपणे शहरात विक्री सुरु आहे. हे महापालिका पथकास निदर्शनास आले होते. आज पथकाने शहरातील आयटीआय कॉर्नर येथे पर राज्यातील व्यापाऱ्यांवर कारवाई केली. यावेळी त्यांच्याकडील मॅट जप्त करण्यात आल्या आहेत. व्यापाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी या मॅट वापरलेल्या मास्कपासून बनविल्याचे मान्य केले. तसेच दिल्ली व राजस्थान येथून हा माल विक्रीसाठी शहरात येत असल्याचे पुढे आले आहे, अशी माहिती मनपा उपआयुक्त अजितपालसिंघ संधू यांनी दिली.