भोकरमध्ये धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:49 AM2020-12-04T04:49:49+5:302020-12-04T04:49:49+5:30
आंदोलकांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना तहसीलदार यांच्या मार्फत पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नवीन कृषी कायद्या ...
आंदोलकांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना तहसीलदार यांच्या मार्फत पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नवीन कृषी कायद्या विरोधात दिल्लीकडे निघालेल्या आंदोलक शेतकऱ्यांवर सरकार बळाचा वापर करुन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. नायब तहसीलदार एस.एम. पांडे यांनी निवेदन स्वीकारले. धरणे आंदोलनात झालेल्या भाषणात केंद्र सरकारच्या कामगिरीचा समाचार घेत रोष व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात काँग्रेस तालुकाध्यक्ष जगदीश पाटील भोसीकर, गोविंदबाबा गौड, रामचंद्र मुसळे, मनोज गिमेकर, ताहेर बेग, राजू पाटील दिवशीकर, खाजू इनामदार, गंपु पाटील, अॅड.शेख मुजाहिद, विलास हटकर, बालाजी शानमवाड, माधव अम्रतवाड, गणपत करंदीकर आदीसह शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.