शीख धर्मीय महिलांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:13 AM2021-06-29T04:13:45+5:302021-06-29T04:13:45+5:30
सचखंड गुरुद्वारा तख्तचे मुख्य जथेदार सिंघ साहिब संत बाबा कुलवंतसिंघ जी यांचा आशीर्वाद घेऊन धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. ...
सचखंड गुरुद्वारा तख्तचे मुख्य जथेदार सिंघ साहिब संत बाबा कुलवंतसिंघ जी यांचा आशीर्वाद घेऊन धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. गुरुद्वारा लंगर साहिबचे जथेदार संत बाबा बलविंदरसिंघ जी यावेळी उपस्थित होते.
२९ मार्चरोजी हल्ला मोहल्ला मिरवणुकीमध्ये काही समाजकंटकांच्यावतीने पोलीस प्रशासनावर हल्ले करून, शासकीय संपत्तीची नासधूस करण्यात आली होती. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. या प्रकरणात निष्पाप व निर्दोष लोकांविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे परत घेण्यात यावेत, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले.
वरिष्ठ पोलीस अधिका-यांची दिशाभूल करून निर्दोष व्यक्तींची नावे सदरील गुन्हयामध्ये टाकण्यात आली आहेत, त्यांचा या घटनेमध्ये काहीएक संबंध नव्हता. जिल्हाधिकारीसाहेबांनी शांतता समितीच्या बैठकीमध्ये असे संबोधन आश्वासन दिले होते की, कुठल्याही निर्दोष व्यक्तीवर गुन्हे दाखल होणार नाही, आम्हा निर्दोष व्यक्तीवर झालेले गुन्हे मागे घेऊ, असे आश्वासन दिले होते. परंतु आज घटना होऊन ९० दिवस झाले; पण पोलिसांनी निष्पाप लोकांवर दोषपत्र कोर्टामध्ये दाखल केले आहे. यावेळी प्रेमजीतकौर कोल्हापुरे, नीलमकौर पुजारी, मंदीप कौर, गुरुप्रसाद कौर, प्रियंकाकौर-दुकानदार, पिंकीकौर हंडी, नीलमकौर, प्रेमजितकौर, प्रीतमकौर, हर्बन्सकौर, सुरजितकौर महाजन, ब्रिजपालकौर, किरपालकौर, तेजिंदर कौर, राजवंतकौर, धरमकौर, उतमकौर यांचा आंदोलनात सहभाग होता.