काकडीचा वेल उपटला म्हणून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:16 AM2021-02-07T04:16:56+5:302021-02-07T04:16:56+5:30

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू नांदेड : शहरातील यशवंत कॉलेज रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. ही घटना ...

Beat as the cucumber vine is uprooted | काकडीचा वेल उपटला म्हणून मारहाण

काकडीचा वेल उपटला म्हणून मारहाण

Next

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

नांदेड : शहरातील यशवंत कॉलेज रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. ही घटना ३ फेब्रुवारी रोजी घडली. रमेश लिंगय्या मत्ती रा. दयानंद नगर हे ३ फेब्रुवारी राेजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास यशवंत कॉलेज रस्त्यावरून जात होते. यावेळी अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात विशाल मत्ती यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोना. शेख इब्राहिम हे करीत आहेत.

पाच ठिकाणी जुगार अड्ड्यावर धाडी

नांदेड : जिल्ह्यात धर्माबाद, मुदखेड, सोनखेड आणि रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच ठिकाणी जुगार अड्ड्यावर धाडी मारण्यात आल्या. यावेळी रोख रक्कम जप्त करण्यात आली.

धर्माबाद येथे सागर बिअर बारच्या पाठीमागे तिर्रट नावाचा जुगार सुुरू होता. या ठिकाणाहून पोलिसांनी ३ हजार रुपये जप्त केले. मुदखेड हद्दीत इदगाव मैदानाच्या शेजारी एका वेल्डिंगच्या दुकानात टाइम बाजार नावाचा मटका सुरू होता. या ठिकाणाहून पोलिसांनी दीड हजार रुपये जप्त केले. सोनखेड हद्दीत मौजे पेनूर येथे दोन ठिकाणी धाडभ मारून ५ हजार रुपये जप्त केले. तर रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत महेबूबनगर येथे मटका अड्ड्यावर धाड मारून १३ हजार रुपये जप्त केले. या प्रकरणात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

दारूची वाहतूक करताना पकडले

नांदेड : मौजे त्रिकूट ते पाथ्रड रस्त्यावरून दारूची अवैधपणे होणारी वाहतूक पोलिसांनी पकडली. ५ फेब्रुवारी रोजी ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपीकडून १२ हजार रुपयांची देशी दारू आणि एक स्कुटी असा ५५ हजारांचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणात बारड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Beat as the cucumber vine is uprooted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.