मारहाण करुन विष पाजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:13 AM2021-07-19T04:13:32+5:302021-07-19T04:13:32+5:30
रेल्वे कॉलनीतून दुचाकी चोरीला शहरातील रेल्वे कॉलनीतून सरदारसिंघ जयप्रकाश यांची दुचाकी घरासमोरुन लांबविण्यात आली. ही घटना ११ जुलै रोजी ...
रेल्वे कॉलनीतून दुचाकी चोरीला
शहरातील रेल्वे कॉलनीतून सरदारसिंघ जयप्रकाश यांची दुचाकी घरासमोरुन लांबविण्यात आली. ही घटना ११ जुलै रोजी घडली. या प्रकरणात वजिराबाद पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
व्यापाऱ्याला बेदम मारहाण
शहरातील चंदासिंग कॉर्नर परिसरात माल न दिल्याच्या कारणावरुन एका व्यापाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना १७ जुलै रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.
सय्यद इम्रान हाश्मी महेमूद हाश्मी हे दुकानात बसलेले असताना आरोपी त्या ठिकाणी आले. यावेळी त्यांनी आमच्या वडिलांना माल का दिला नाही म्हणून वाद घालत त्यांना मारहाण केली. या प्रकरणात सुनील सूर्यकांत दामेकर, बालाजी दामेकर आणि स्वप्नील मोगले यांच्या विरोधात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
बोमनाळी शिवारात शेतकऱ्याला मारहाण
मुखेड तालुक्यातील बोमनाळी शिवारात शेतात काटे टाकण्याच्या कारणावरुन झालेल्या वादानंतर शेतकऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना ५ जुलै रोजी घडली. या प्रकरणात माधव लक्ष्मण घोडके यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद झाला.
मूलबाळ होत नसल्याने छळ
किनवट तालुक्यातील मौजे टिगनवाडी येथे मूलबाळ होत नसल्याने विवाहितेचा छळ करण्यात आला. शेतात बोअर पाडण्यासाठी आणि दुचाकी घेण्यासाठी पीडितेला माहेराहून दोन लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीसाठी पीडितेला मारहाण करण्यात आली. या प्रकरणात किनवट पोलिसांनी गुन्हा नोंद केला.
पाच लाखांसाठी विवाहितेला मारहाण
व्यापार करण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करीत विवाहितेला मारहाण करुन घराबाहेर हाकलण्यात आले. पैसे घेऊन आली तरच नांदवितो असे म्हणून घराबाहेर हाकलले. या प्रकरणात सौरभ सोनी, श्यामलाल सोनी, खुशबू सोनी, डॉ. डॉली सोनी यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला.
दोन ठिकाणी जुगारावर धाडी
देगलूर शहरात सार्वजनिक रस्त्यावर आणि नांदेड शहरात देगलूर नाका भागात सुरु असलेल्या दोन जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाडी मारल्या. यावेळी सात हजार रुपये जप्त करण्यात आले असून दोन्ही ठाण्यात गुन्हे नोंद झाले.