किरकोळ कारणावरून एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:18 AM2021-04-07T04:18:27+5:302021-04-07T04:18:27+5:30

कोरोना तपासणी कॅम्प नांदेड - मनपा क्षेत्रीय कार्यालय एक अंतर्गत चैतन्यनगर येथील साईबाबा मंदिर परिसरात कोरोना तपासणी कॅम्प सुरू ...

Beating one for a trivial reason | किरकोळ कारणावरून एकास मारहाण

किरकोळ कारणावरून एकास मारहाण

Next

कोरोना तपासणी कॅम्प

नांदेड - मनपा क्षेत्रीय कार्यालय एक अंतर्गत चैतन्यनगर येथील साईबाबा मंदिर परिसरात कोरोना तपासणी कॅम्प सुरू करण्यात आला. यात ३०० हून अधिक जणांची तपासणी करण्यात आली. त्यात २५ कोरोना बाधित रुग्ण सापडले. उपमहापौर सतीश देशमुख, नगरसेविका कविता मुळे यांनी कॅम्पला भेट दिली. कॅम्पसाठी सहाय्यक आयुक्त संजय जाधव, स्वच्छता निरीक्षक विश्वनाथ कल्याणकर, साहेबराव ढगे, बालाजी रत्नपारखे, सुरेश हिंगोले, नागनाथ भोसले, श्याम कानोटे, कृष्णा पाथरकर, मारोती रणखांबे, शुभम वाघमारे आदी परिश्रम घेत आहेत.

मुसळे यांचा विजय

भोकर - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून काँग्रेसच्या सविता रामचंद्र मुसळे विजयी झाल्या. त्यांनी भाजपाचे लक्ष्मण ठक्करवाड यांचा पराभव केला. मुसळे यांना २४७ मते मिळाली.

खांब आला मोडकळीस

बिलाेली - येथून सात कि.मी. अंतरावरील बावलगावमधील प्रभाग क्र.१ मध्ये असलेला विद्युत खांब मोडकळीस आला. सरपंच लक्ष्मण गायकवाड यांनी या संदर्भात तक्रार करून नवीन खांब बसवण्याची मागणी केली. मात्र ती पूर्ण झाली नाही. परिसरातील नागरिकांना मोडकळीस खांबामुळे जीवितहानी होण्याची शक्यता आहे असे नागरिकांनी नमूद केले.

लस देण्यास सुरुवात

मुखेड - तालुक्यातील मौजे रावी ग्रामपंचायत येथे कोरोना प्रतिबंधक लसीची सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ.जगदीश रावीकर, ग्रामविकास अधिकारी एच.एम. वाघमारे, तलाठी एम.एस.पदाजी, डॉ.शेख, आरोग्य सेविका एन.के. जाधव, कर्मचारी नागनाथ दमकोंडवार आदी उपस्थित होते. यावेळी ४५वर्षावरील ४० लोकांना लस देण्यात आली.

करडईचा अनोखा उपक्रम

लोहा - तालुक्यातील सायाळ येथील प्रगतीशील शेतकरी रत्नाकर ढगे यांनी सेंद्रीय पद्धतीने करडई पिकविण्याचा उपक्रम घेतला. त्यांनी प्रतीएकर ५ क्विंटलप्रमाणे ३ एकरमध्ये १५ क्विंटलचे विक्रमी उत्पन्न घेतले.

बेटमोगरेकर यांचा सत्कार

मुखेड - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष नंदकुमार मडगुलवर, प्रवक्ते दिलीप कोडगीरे, उत्तम चौधरी, डॉ.श्रावण रॅपनवाड आदी उपस्थित होते.

Web Title: Beating one for a trivial reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.