वारसा प्रमाणपत्रावर केवळ दोनच नाव लिहिण्याचा आग्रह करत पोलिस पाटीलास मारहाण

By शिवराज बिचेवार | Published: April 22, 2023 05:40 PM2023-04-22T17:40:32+5:302023-04-22T17:40:45+5:30

या प्रकरणात आरोपीच्या विरोधात भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Beating the police constable for insisting to write only two names on the inheritance certificate | वारसा प्रमाणपत्रावर केवळ दोनच नाव लिहिण्याचा आग्रह करत पोलिस पाटीलास मारहाण

वारसा प्रमाणपत्रावर केवळ दोनच नाव लिहिण्याचा आग्रह करत पोलिस पाटीलास मारहाण

googlenewsNext

नांदेड : वारसावर केवळ दोनच नावे लिहून द्या, असा तगादा लावून पोलिस पाटील यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. ही घटना भोकर तालुक्यातील लामकाणी येथे २० एप्रिल रोजी घडली. या प्रकरणात आरोपीच्या विरोधात भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

बाबाराव पांडुरंग जाधव हे पोलिस पाटील दुपारच्या वेळी घरी असताना तेथे पंडित धोंडीबा पवार हा आला. वारसा प्रमाणपत्रावर फक्त दोनच वारसांची नावे लिहून द्या, इतर वारसांची नावे लिहिण्याची गरज नाही, असे पवार म्हणाला. परंतु, पोलिस पाटील जाधव यांनी प्रमाणपत्रावर सर्व वारसांची नावे लिहावी लागतील, असे सांगितले. त्यानंतर चिडलेल्या पवार याने घराबाहेर पोलिस पाटील जाधव यांना मारहाण केली, तसेच शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात जाधव यांनी ठाण्यात तक्रार दिली.

Web Title: Beating the police constable for insisting to write only two names on the inheritance certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.