नाट्यमय घडामोडीनंतर बेळकोणीची ग्रामपंचायत बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:54 AM2021-01-08T04:54:27+5:302021-01-08T04:54:27+5:30
बेळकोणी बुद्रूक येथील ९ सदस्यीय ग्रामपंचायतीसाठी यापूर्वीच जयश्री राजेश्वर बुद्धेवार , राजेंद्र शंकर डाकेवाड , शिवाजी सायन्ना इरलेवाड ...
बेळकोणी बुद्रूक येथील ९ सदस्यीय ग्रामपंचायतीसाठी यापूर्वीच जयश्री राजेश्वर बुद्धेवार , राजेंद्र शंकर डाकेवाड , शिवाजी सायन्ना इरलेवाड , आशाबाई इरन्ना उसकेलवाड, सागरबाई बालाजी लिंगम , हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्याने चार जागांसाठी येथे आठ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी येथील चार उमेदवारांनी अचानक माघार घेतली असल्याने सागरबाई गोविंद मंचलवाड , शेषाबाई शंकर सूर्यवंशी , ज्योती हनमंत मुदनकर , करीम मिरासाब शेख यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. नऊ सदस्यही बिनविरोध विजयी झाले. प्रारंभी येथे चार जागांसाठी निवडणूक अटळ दिसत होती. उमेदवारीवर उमेदवार ठाम होते. मात्र, रामकिशन पाटील बुद्धेवार
विठ्ठल सायना तरकंटे, आनंद मंचलवाड, प्रकाश येरावाड, व्यंकट बुद्धेवार, नामदेव तरकंटे, राजेश शंकुरवाड, मोहन मुदनकर,तंटामुक्ती अध्यक्ष बळीराम मुदनकर यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारांची समजूत घातली. त्यामुळे ऐनवेळेला ही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. बेळकोणी ग्रामपंचायतीची ही बिनविरोध निवड करण्यात रामकिशन पाटील बुद्धेवार यांची महत्वपूर्ण भूमिका राहिली असून, चार जागेसाठी निवडणूक अटळ असतांना सामंजस्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.