रेशन दुकान बंदसाठी लाभार्थी एकवटले...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 01:05 AM2019-02-09T01:05:02+5:302019-02-09T01:07:38+5:30
शहरातील देशमुखनगर येथील धुरपतबाई नबाजी जेठे या नावाने असलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराकडून भास्करनगर येथील ७८ रेशनकार्डधारकांना स्वस्त धान्याचे रेशन मिळत नसल्याने सर्व लाभार्थी एकवटून स्वस्त धान्य दुकान बंद करण्यासाठी पुरवठाचे नायब तहसीलदार उत्तम निलावाड यांना निवेदन दिले़
बिलोली : शहरातील देशमुखनगर येथील धुरपतबाई नबाजी जेठे या नावाने असलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराकडून भास्करनगर येथील ७८ रेशनकार्डधारकांना स्वस्त धान्याचे रेशन मिळत नसल्याने सर्व लाभार्थी एकवटून स्वस्त धान्य दुकान बंद करण्यासाठी पुरवठाचे नायब तहसीलदार उत्तम निलावाड यांना निवेदन दिले़
सदरील दुकानाचा परवाना एकाच्या नावावर व कारभार मात्र दुसऱ्यांकडे असल्याने दुकानदाराकडून लाभार्थ्यांना अरेरावीची भाषा, दर महिन्याला कागदपत्रांना पैसे हवे आहेत म्हणून प्रत्येक कार्डधारकांकडून २०० रुपये घेणे, चना व तुरीची डाळ वाटप न करताना काळ्या बाजारात विकणे व स्वस्त धान्यांचे वाटप एका जनावरांच्या गोठ्यात करीत असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यासह शासकीय नियमाप्रमाणे अंत्योदय, बीपीएल, शेतकरी प्राधान्य या लाभार्थ्यांना तांदूळ प्रतिकिलो ३ रुपये तर गहू २ रुपये प्रतिकिलो दराने दिला जावा, असा नियम असताना या स्वस्त धान्य दुकानदाराकडून ३५ किलो धान्यांसाठी ८५ रुपयांऐवजी १५० रुपये घेतले जात असल्याने लाभार्थ्यांची पिळवणूक होत असल्याने महिला लाभार्थ्यांनी पुरवठा विभागाचे नायब तहसीलदारासमोर गाºहाणे मांडले़ सदरील दुकानाचा परवाना तात्काळ बंद करुन गत ३ महिन्यांपासून वंचित असलेल्या ७८ लाभार्थ्यांना धान्य देण्याची मागणी केली. मागण्या पूर्ण न दिल्यास २५ फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा निवेदनामध्ये दिला आहे.
सदरील दुकानाचा परवाना तात्काळ बंद करा व गत तीन महिन्यांपासून वंचित असलेल्या ७८ लाभार्थ्यांना धान्य न दिल्यास २५ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनावर नगरसेवक जावेद कुरेशी, शारदा पोतुलवार, शिवाजी तुडमे, लक्ष्मीबाई दंडलवाड, नजीर बेग, लक्ष्मीबाई जाधव यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षºया आहेत. अनेकांच्या तक्रारीवरुन गत काही दिवसांपूर्वी बिलोली पुरवठा विभागाकडून सदरील दुकानाची चौकशी झाली व लाभार्थ्यांनी केलेली तक्रार खरी ठरली मात्र याकडे वरिष्ठांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती नगरसेवक जावेद कुरेशी यांनी दिली़
मी अंत्योदय रेशन कार्डधारक लाभार्थी असून मला गत २ महिन्यांपासून स्वस्त धान्य मिळाले नाही़ धान्यासाठी गेले असता उलट मला वाढप्याकडून शिव्या खाव्या लागत आहेते. सदरील दुकान बंद करा अन्यथा उपोषण करणार -शारदाबाई पोतुलवार, अंत्योदय लाभार्थी, बिलोली
देशमुखनगर येथील धुरपतबाई नबाजी जेठे या परवानाधारकाकडून लाभार्थ्यांना जाणीवपूर्वक छळले जात असून लाभार्थ्यांना स्वस्त धान्यापासून वंचित ठेवले जात आहे. स्वस्त धान्य दुकानची चौकशी केली व लाभार्थ्यांचा जबाब घेऊन सदरील परवाना रद्द करण्याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे - उत्तम निलावाड, पुरवठा अधिकारी बिलोली़