सिंदगीत अस्वलाला विहिरीबाहेर काढण्यात मिळाले यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:15 AM2018-01-21T00:15:51+5:302018-01-21T00:16:21+5:30
पाण्याच्या शोधात आलेले अस्वल विहिरीत पडल्याची घटना २० जानेवारी रोजी सिंदगी येथे घडली. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर अस्वलाला बाहेर काढण्यात यश आले. तब्बल पाच तासांनंतर अस्वलाला बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोधडी (ता. किनवट) : पाण्याच्या शोधात आलेले अस्वल विहिरीत पडल्याची घटना २० जानेवारी रोजी सिंदगी येथे घडली. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर अस्वलाला बाहेर काढण्यात यश आले. तब्बल पाच तासांनंतर अस्वलाला बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु झाली.
त्यानंतर तीन तासांनी विहिरीतील अस्वलाला बाहेर काढण्यात वनविभागाच्या अधिका-यांनी यश आले. सिंदगी येथे सकाळी नऊ वाजता पाण्याच्या शोधात आलेले अस्वल शेतकरी इंदल भिकू चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत पडले. ही बाब शेतक-याच्या निदर्शनास येतास त्यांनी वन कर्मचा-यांना कळविले. वनपरिक्षेत्र अधिकारी एम. एम. जोगदंड हे दुपारी दोन वाजता घटनास्थळी हजर झाले. तत्पूर्वी बोधडी वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. प्रारंभी वन विभागाच्या कर्मचा-यांनी व नागरिकांनी जाळीच्या सहाय्याने अस्वलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, वर काढताना अस्वल पुन्हा विहिरीत पडून त्याच्या तोंडाला मार लागला. तोंडातून रक्तस्त्रावही होत होता. पुन्हा जाळी टाकून अस्वलाला बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान, पिंज-यात टाकत असताना अस्वलाने झटका देवून जंगलात पळ काढला. तो पुन्हा काही हाती लागला नाही.