दहावीनंतर अभियांत्रिकी पदविका उत्कृष्ट पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 12:24 AM2019-06-02T00:24:21+5:302019-06-02T00:25:03+5:30

शालांत परीक्षेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉग़ोरक्ष गर्जे यांच्याशी संवाद साधून दहावीनंतर अभियांत्रिकी पदविका प्रवेशप्रक्रिया, विविध कोर्सेसचे महत्त्व, जागतिकीकरणाच्या अनुषंगाने तंत्रशिक्षणाचे महत्त्व, आवश्यक असलेले मनुष्यबळ तसेच उपलब्ध रोजगाराच्या संधी या विविध मुद्यांविषयी मुलाखतीद्वारे विस्तृत चर्चा केली़

The best option for engineering diploma after 10th standard | दहावीनंतर अभियांत्रिकी पदविका उत्कृष्ट पर्याय

दहावीनंतर अभियांत्रिकी पदविका उत्कृष्ट पर्याय

Next

अभियांत्रिकी पदविकाचे महत्त्व कसे अधोरेखित कराल?
जागतिकीकरण, डिजिटल इंडिया, स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया तसेच आर्थिक महासत्तेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विविध क्षेत्रांत कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर भारताला नजीकच्या काळात गरज भासणार आहे़ अभियांत्रिकीच्या माध्यमातून कौशल्याधारित मनुष्यबळाची निर्मिती साध्य होऊ शकते़ २०१७ पासून पदविका शिक्षणात रोजगाराभिमुख व स्वयंरोजगार निर्मितीस चालना देणारे बनवण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमात आवश्यक बदल केले आहेत़ याची फलनिष्पत्ती निश्चितपणे दिसून येईल़
अलीकडे अभियांत्रिकी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाला?
अभियांत्रिकी शिक्षणाबाबत विशेषत: ग्रामीण भागात पुरेशी जागरुकता नसल्याचे आढळते़ यासाठी तंत्रशिक्षण विभागाने व शासकीय तंत्रनिकेतन यांनी तालुकानिहाय संपर्क अभियान, करिअर्स आॅन व्हील, करिअर फेअर, समुपदेशन केंद्र, आकाशवाणी व संपर्क माध्यमातून प्रसिद्धी करण्यात येत आहे़ अभियांत्रिकी शिक्षण हे अतिशय खर्चिकही नाही़ शासनस्तरावर अनेक शिष्यवृत्ती, फी माफी व अनुषंगिक सवलती सर्व समाजघटकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या़ अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत़ हा समज पूर्णपणे खरा नाही़ आजमितीला भारतात व जागतिकस्तरावर उपलब्ध असणारे जास्तीत जास्त रोजगार हे अभियांत्रिकी क्षेत्रातीलच असल्याचे आढळून येते़ विविध स्पर्धा परीक्षेसाठीची क्षमता अभियांत्रिकीतून विकसित झाली़
दहावीनंतर अभियांत्रिकी पदविकाच का?
रोजगार व स्वयंरोजगाराच्या मुबलक संधी, कमी खर्चात पूर्ण होणारे शिक्षण, उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षेपासून सुटका इ़ जमेच्या बाजू पाहता दहावीनंतर अभियांत्रिकी पदविका हा एक उत्तम पर्याय ठरतो़ पदविका शिक्षणामुळे पाया अधिक भक्कम बनतो व भविष्यात आपआपल्या क्षेत्रात ठसा उमटवण्यासाठी हा अभ्यासक्रम अतिशय उपयुक्त असल्याचे दिसून येते़
विद्यार्थ्यांनो, योग्य संस्था निवडा
संस्था निवडताना संस्थेचे भौगोलिक स्थान, तेथील सुविधा, शिक्षक, शैक्षणिक वातावरण, निकालाची परंपरा, कॅम्पस भरती, वसतिगृहाची सोय आदींचा विचार करणे आवश्यक आहे़ शाखा निवडताना सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांचा कल, कौटुंबिक पार्श्वभूमी, भविष्यकालीन उद्दिष्ट, रोजगाराच्या संधी आदी बाबींचा अभ्यास करावा़ शाखा निवड अतिशय क्लिष्ट असल्याने सविस्तर मार्गदर्शनासाठी राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित महाविद्यालयांमधील समुपदेशन केंद्रास भेट देवून माहिती प्राप्त करता येईल़ नांदेड येथील शासकीय तंत्रनिकेतन जुनी व प्रतिष्ठित संस्था आहे़ सर्व सोयी आहेत़ पोषक शैक्षणिक वातावरण आहे़ वसतिगृह, खेळाचे मैदान आदीही उपलब्ध आहे़ संस्थेमध्ये स्थापत्य, यंत्र, विद्युत, उत्पादन, माहिती व तंत्रज्ञान, मेडिकल, इलेक्ट्रॉनिक्स आदी अभियांत्रिकी पदविका उपलब्ध आहे़

आऊटकम बेसड् शिक्षण हे सुधारित अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचे ठळक वैशिष्ट्य आहे़ या अंतर्गत विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारक्षम बनविण्यासाठी प्रत्येक विषयाला मायक्रो प्रोजेक्ट, औद्योगिक प्रशिक्षण, प्रात्यक्षिक संवाद कौशल्य, मुल्यवर्धन शिक्षण, पर्यावरण आदींवर भर देण्यात आला आहे़

Web Title: The best option for engineering diploma after 10th standard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.