खबरदार...अफवा पसरवाल तर कारवाई - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:34 AM2021-02-21T04:34:01+5:302021-02-21T04:34:01+5:30

नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक पसरु नये यासाठी अंगिकारावयाची त्रिसुत्री म्हणजेच मास्क, सुरक्षित अंतर आणि सतत हात स्वच्छ करणे अथवा ...

Beware ... if rumors spread, action - Collector | खबरदार...अफवा पसरवाल तर कारवाई - जिल्हाधिकारी

खबरदार...अफवा पसरवाल तर कारवाई - जिल्हाधिकारी

Next

नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक पसरु नये यासाठी अंगिकारावयाची त्रिसुत्री म्हणजेच मास्क, सुरक्षित अंतर आणि सतत हात स्वच्छ करणे अथवा सॅनिटायजर वापरणे याचे काटेकोर पालन केले पाहिजे. याबाबत पुरेशी जनजागृतीही आरोग्य विभागामार्फत केली जात आहे. नागरिकांनी जर संयमी जबाबदारी पार पाडली तर जिल्हा प्रशासनाला कठोर पावले उचलायची वेळ येणार नाही, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन म्हणाले.

जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तथापि जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येत असल्याच्या बातम्या, संदेश हे पुर्णत: चुकीचे असून ज्या व्हॉटस्ॲप ग्रुपवर अथवा ट्विटर, इतर कोणत्याही सोशल मिडियावर जर कोणी हे संदेश शेअर केले तर त्यांच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Beware ... if rumors spread, action - Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.