खबरदार! होळीला झाडे तोडाल तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:34 AM2018-03-01T00:34:37+5:302018-03-01T00:34:57+5:30
रस्त्याच्या आजूबाजूची, सार्वजनिक परिसरातील तसेच खाजगी आवारातील झाडे होळीत जाळण्यासाठी सर्रासपणे तोडली जातात़ अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले असून महापालिकेच्या उद्यान विभागातील अधिकारी आणि कर्मचारी होळीच्या अनुषंगाने लक्ष ठेवून राहणार आहेत़ अनधिकृतपणे वृक्षतोड केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : रस्त्याच्या आजूबाजूची, सार्वजनिक परिसरातील तसेच खाजगी आवारातील झाडे होळीत जाळण्यासाठी सर्रासपणे तोडली जातात़ अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले असून महापालिकेच्या उद्यान विभागातील अधिकारी आणि कर्मचारी होळीच्या अनुषंगाने लक्ष ठेवून राहणार आहेत़ अनधिकृतपणे वृक्षतोड केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे़
महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ च्या कलम २१ मधील तरतुदीनुसार वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडणे किंवा तोडण्यासाठी कारणीभूत होणे हा अपराध आहे़ त्यासाठी शिक्षेचीही तरतूद आहे़ गुरुवारी होळीचा सण असून होळीत जाळण्यासाठी सर्रासपणे वृक्षतोड केली जाते़ त्यामुळे झाडांची संख्या कमी होते आणि पर्यावरणाचीही हानी होते़ त्यामुळे वृक्षतोड होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी उद्यान विभागातील अधिकारी आणि कर्मचाºयांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ विजेच्या अपघातापासून काळजी घेण्याची गरज आहे़
झाडे तोडाल तर एक वर्षाची शिक्षा
वृक्षतोड केल्यास एक वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा होवू शकते़ तसेच यासाठी पाच हजारापर्यंत दंड होवू शकतो़ त्यामुळे झाडे तोडू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे़ शहरात वृक्षतोड होत असल्यास नागरीरिकांनी ०२४६२-२६२६२६ वर तक्रार करावी़
होळी पेटविताना नागरिकांनी वृक्षारोपण केलेल्या झाडापासून दूर अंतरावर होळी पेटवावी़ जेणेकरुन आगीच्या ज्वाळामुळे झाडांचे नुकसान होणार नाही़ शहरात वृक्षतोड करु नये, असे आवाहन उद्यान अधीक्षक डॉ. फरहतउल्ला मिर्झा बेग यांनी केले आहे़