‘भिंती पलीकडले’ ने घेतला चंचल मानवी मनाचा ठाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 12:58 AM2018-12-04T00:58:00+5:302018-12-04T00:58:14+5:30

समाजाच्या भीतीपोटी, इज्जतीपोटी तो आतले रूप दाखवत नाही़ ते तो चार भिंतीत दडवून ठेवतो, पण जर भिंती पलीकडले दिसायला लागले तर, त्याचे सर्व अंतररूप बाहेर पडते आणि यामुळे खूप जवळची वाटणारी माणसे आपल्यापासून तुटू लागतात.

'Bhindhali Palikade' took out the fickle human mind | ‘भिंती पलीकडले’ ने घेतला चंचल मानवी मनाचा ठाव

‘भिंती पलीकडले’ ने घेतला चंचल मानवी मनाचा ठाव

Next
ठळक मुद्देराज्य हौशी नाट्यस्पर्धा : काल्पनिक जग वास्तववादात

नांदेड : प्रत्येक व्यक्तीचे बाह्यरुप वेगळे आणि अंतररूप वेगळे असते. बाहेरून तो कितीही चांगला वाटत असला तरी त्याच्या अंतररुपात काहीतरी घालमेल चालू असते. समाजाच्या भीतीपोटी, इज्जतीपोटी तो आतले रूप दाखवत नाही़ ते तो चार भिंतीत दडवून ठेवतो, पण जर भिंती पलीकडले दिसायला लागले तर, त्याचे सर्व अंतररूप बाहेर पडते आणि यामुळे खूप जवळची वाटणारी माणसे आपल्यापासून तुटू लागतात. यामुळेच मानवी चंचल मनाचा, ठाव घेणारे नाटक म्हणजे भिंती पलीकडले असे आपण म्हणू शकतो़
महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीत नांदेड केंद्रावर तन्मय ग्रूप, नांदेडच्या वतीने नाथा चितळे लिखित, दिग्दर्शित ‘भिंती पलीकडले’ या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण झाले. माणसांच्या अतींद्रिय शक्तीचा अचानक विकास झाला तर काय काय घडू शकते, ते या नाटकात दर्शविले़ इथे तर एका कुटुंबातील सर्वच सदस्यांची अतींद्रिय शक्ती जागी होते व त्याद्वारे साऱ्यांनाच एकमेकांचे अंतरंग कळून कुटुंब उद्ध्वस्त व्हायला लागते. चाळीशी उलटलेले नवरा श्रवण गुप्ते ( गणेश पांडे ) बायको सुगंधा गुप्ते ( शुभांगी वाणी ) त्यांची तरुण असलेली मुलगा नयन (सुयोग भोरे) व मुलगी स्पर्शा ( सायली जोशी ) व आजोबा (त्र्यंबक मगरे ) अशा चौकोनी कुटुंबात साºयांनाच भिंती पलीकडले जाणवायला लागते़ वडिलांना भिंती पलीकडले ऐकू येते , बायकोला वास येतो, मुलीला स्पर्शातूून अंतरंग कळते़ कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे अंतर्मन उलगडायला लागते, नको त्या गोष्टी एकमेकांना कळत जातात़ काल्पनिक जगाला, वास्तववादी स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. दिनकर दलाल, उमेश देशमुख, विश्वजित भोगले यांनी साकारलेले नेपथ्य सूचक आणि सत्याचा आभास निर्माण करणारे होते. सचिन गायकवाड, किरण कराड, नीलिमा चितळे, यांनी प्रकाशयोजनेची बाजू सांभाळली.

Web Title: 'Bhindhali Palikade' took out the fickle human mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.