भोकरमध्ये उड्डाणपुलाखालचे अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 11:54 PM2018-12-07T23:54:11+5:302018-12-07T23:54:56+5:30

शहरातील प्रमुख रस्त्यावर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाखाली बस्तान मांडून दुकाने थाटून केलेले अतिक्रमण काढण्याची मोहीम नगरपरिषदेने शुक्रवारी केली.

In Bhokar the encroachment of the flyover was removed | भोकरमध्ये उड्डाणपुलाखालचे अतिक्रमण हटविले

भोकरमध्ये उड्डाणपुलाखालचे अतिक्रमण हटविले

Next
ठळक मुद्दे रेल्वेलाईनवर उड्डाणपूल व भुयारी मार्ग करण्याचे काम सुरु शहराचे सौंदर्य, स्वच्छता आणि रहदारीचा प्रश्न

भोकर : शहरातील प्रमुख रस्त्यावर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाखाली बस्तान मांडून दुकाने थाटून केलेले अतिक्रमण काढण्याची मोहीम नगरपरिषदेने शुक्रवारी केली.
शहराच्या अंतर्गत विकासासाठी मजबूत रस्ते, नाली विकासाची कामे हाती घेवून मागील दोन वर्षांपूर्वी शहरातून जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावरील रेल्वेलाईनवर उड्डाणपूल व भुयारी मार्ग करण्याचे काम सुरु आहे. सदरील काम सध्या प्रगतीपथावर आहे. यात रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूने उड्डाणपूल निमार्णाधीन आहे. तयार होत असलेल्या या पुलाखाली व्यावसायिकांनी हातगाडे, चहाचे गाडे, पानटपरी आणि खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय सुरु करुन अतिक्रमण केले होते. यामुळे शहराचे सौंदर्य, स्वच्छता आणि रहदारीचा प्रश्न निर्माण होवून विकासकामात अडथळा निर्माण होत होता. तर निमार्णाधीन उड्डाणपुलाखाली बांधकामाचे साहित्य पडण्याचा आणि त्यामुळे अनपेक्षित अपघात होण्याचा धोका निर्माण झाला होता.
झालेले अतिक्रमण निघाल्याने उड्डाणपुलाखालची जागा मोकळी झाली असून यामुळे तयार होणाºया अस्वच्छतेला आळा बसल्याने शहरवासियांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तर पुलाखालील अतिक्रमण निघाले मात्र, शहरातील मुख्य रस्त्यावरील पादचारी मार्गावर मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणाकडे नगरपालिकेचा मोर्चा कधी वळणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. उड्डाणपुलाखाली असलेले काही साहित्य जप्त करण्यात आले.
सुरुवातीला काही दुकानदारांनी दुकाने थाटल्यानंतर दिवसेंदिवस अतिक्रमणात वाढ होत होती. याबाबत व्यावसायिकांना आपली अतिक्रमणे स्वत: काढून घेण्याच्या सूचना नगरपरिषदेने तोंडी व ध्वनिक्षेपाद्वारे वारंवार केली होती. तरीही अतिक्रमण निघत नसल्यामुळे अखेर पालिका कर्मचाºयांच्या पथकाने सदरील अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविली.

Web Title: In Bhokar the encroachment of the flyover was removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.