दुचाकी स्टंटबाजीला भोकर पोलिसांचा चाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:15 AM2020-12-08T04:15:08+5:302020-12-08T04:15:08+5:30
भोकर : शहरातील प्रमुख रस्त्यांवर बेजबाबदारपणे दुचाकीवरून धाव घेत स्टंटबाजीसह फटाक्यासारखा कर्णकर्कश ध्वनी करणारी २८ वाहने ताब्यात घेऊन दुचाकीस्वारांवर ...
भोकर : शहरातील प्रमुख रस्त्यांवर बेजबाबदारपणे दुचाकीवरून धाव घेत स्टंटबाजीसह फटाक्यासारखा कर्णकर्कश ध्वनी करणारी २८ वाहने ताब्यात घेऊन दुचाकीस्वारांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
शहरातील विविध रस्त्यांवर हल्ली काही दुचाकीस्वार धूम स्टाईल वावरत असून, कर्णकर्कश आवाजासह स्टंटबाजी करीत असल्याच्या घटना घडत आहेत. यामुळे रस्त्यावरून चालणाऱ्या महिला, बालक, वृद्धांना असुरक्षित वाटत होते. यावर आवर घालण्यासाठी पो. नि. विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मोहीम हाती घेऊन तब्बल २८ दुचाकी ताब्यात घेतल्या. ताब्यातील वाहनांचे मॉडीफाईड केलेले सायलन्सर जप्त करून पुढील कारवाईकरिता आरटीओ कार्यालयाला कळविण्यात आले. अशाच पद्धतीची कारवाई यापुढेही सुरूच राहील, त्यात दोषी आढळल्यास वाहन परवाना रद्द करण्यात येईल, असे पो.नि. विकास पाटील यांनी सांगितले.
फोटोसह
भोकर पोलिसांनी कर्णकर्कश ध्वनी निर्माण करणाऱ्या २८ दुचाकींचे जप्त केलेले सायलन्सर.