भोकरला अतिरिक्त पाणीसाठ्यासह सिंचनासाठी मिळणार पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:14 AM2021-07-15T04:14:22+5:302021-07-15T04:14:22+5:30
गोदावरी खोऱ्याच्या सुधा सुवर्णा उपखोऱ्यात भोकर तालुक्यातील रेणापूर गावाजवळ सुधा नदीवर रेणापूर सुधा मोठे सूक्ष्म जलसिंचन हा प्रकल्प आहे. ...
गोदावरी खोऱ्याच्या सुधा सुवर्णा उपखोऱ्यात भोकर तालुक्यातील रेणापूर गावाजवळ सुधा नदीवर रेणापूर सुधा मोठे सूक्ष्म जलसिंचन हा प्रकल्प आहे. या प्रकल्पातून परिसरातील पाण्याची गरज भागवली जाते. भोकर नगरपंचायतीकडून पिण्याच्या पाण्यासाठी पाणी आरक्षित करण्याची मागणी वाढल्याने सिंचनासाठी पाणीसाठा अपुरा पडत होता. पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी पाणीसाठा वाढविण्यासाठी या जलसिंचन प्रकल्पाची उंची वाढविण्यासाठी पाठपुरावा केला. गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळाने रेणापूर सुधा प्रकल्पाची उंची वाढविणे, विस्तार व सुधारण्यासंबंधीचा प्रस्ताव मान्यतेसाठी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे पाठवला होता.
या प्रकल्पाची उंची वाढविल्यामुळे या प्रकल्पाच्या एकूण पाणीसाठ्यात ७.९४७ क्यूबिक मीटरवरून ९.९९७ क्यूबिक मीटर इतकी वाढ होणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १०.४१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.