कोरोनामुक्‍तीचा भोसी पॅटर्न आता जिल्‍हाभरात राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:17 AM2021-05-14T04:17:46+5:302021-05-14T04:17:46+5:30

भोकर तालुक्‍यातील भोसी प्राथमिक आरोग्‍य केंद्रांतर्गत सर्व आरोग्‍य कर्मचारी, आशा वर्कर, परिचारिका, अंगणवाडी कार्यकर्ती, वैद्यकीय अधिकारी यांची बैठक घेऊन ...

Bhosi pattern of coronation will now be implemented in the entire district | कोरोनामुक्‍तीचा भोसी पॅटर्न आता जिल्‍हाभरात राबविणार

कोरोनामुक्‍तीचा भोसी पॅटर्न आता जिल्‍हाभरात राबविणार

Next

भोकर तालुक्‍यातील भोसी प्राथमिक आरोग्‍य केंद्रांतर्गत सर्व आरोग्‍य कर्मचारी, आशा वर्कर, परिचारिका, अंगणवाडी कार्यकर्ती, वैद्यकीय अधिकारी यांची बैठक घेऊन ठाकूर यांनी ऑनलाईन संवाद साधला. या बैठकीस जिल्‍हा परिषद सदस्‍य प्रकाश देशमुख-भोसीकर, जिल्‍हा आरोग्‍य आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, तालुका आरोग्‍य अधिकारी डॉ. राहुल वाघमारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. यू. एम. डोंगरे आदींची उपस्थिती होती. दोन महिन्‍यांपूर्वी एका लग्‍नसोहळ्यानंतर भोसी येथे एकजण कोरोनाबाधित आढळला. त्‍यानंतर पाचजण बाधित आले. ग्रामस्थांनी कोरोनाची प्रचंड धास्ती घेतली होती. मात्र, जिल्‍हा परिषद सदस्‍य प्रकाश भोसीकर यांनी आरोग्‍य विभागाच्‍या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ग्रामस्‍थाचे समुपदेशन केले. कोरोना चाचणीनंतर तब्‍बल ११९ जण बाधित आढळून आले. बाधितांना लगेच त्‍यांच्‍या शेतातच राहण्‍याची सोय करण्‍यात आली. ज्‍यांच्‍याकडे शेती नाही त्‍यांची सोय प्रकाश भोसीकर यांच्‍या शेतात शेडमध्‍ये करण्‍यात आली. आरोग्‍य सेविका, आशाताई, अंगणवाडी कार्यकर्ती यांनी दररोज शेतात जाऊन बाधितांशी संवाद साधून त्‍याच ठिकाणी औषधी व जेवण पुरविले. या उपक्रमामुळे पंधरा दिवसांत ११९ कोरोनाबाधित कोरोनामुक्‍त झाले. बाधित व्‍यक्‍ती गाव सोडून शेतात राहिल्‍यामुळे गावात कोरोना पसरु शकला नाही. या उपक्रमाबाबत मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी तालुका आरोग्‍य अधिकारी डॉ. राहुल वाघमारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. यू. एम. डोंगरे यांच्यासह सर्व आरोग्‍य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. भोसी येथे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी समन्‍वय ठेवून जसा पॅटर्न राबविला तसाच पॅर्टन जिल्‍ह्यात राबविण्‍यात यावा, असे निर्देश त्‍यांनी दिले. जिल्‍हा परिषद सदस्‍य प्रकाश भोसीकर यांच्याकडून डॉ. बालाजी शिंदे यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती घेतली.

फोटो नं. वर्षा ठाकूर, सीईओ, जि.प.नांदेड

फोटो नं. १३एनपीएचएमएवाय-१०

Web Title: Bhosi pattern of coronation will now be implemented in the entire district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.