भोकरमध्ये आज १९४ कोटींच्या विकासकामांचे भूमीपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:17 AM2021-01-22T04:17:06+5:302021-01-22T04:17:06+5:30

भोकर : पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाममंत्री पद असल्याने नांदेड जिल्ह्याला झुकते माप मिळत असून विविध विकासकामे ...

Bhumi Pujan of development works worth Rs 194 crore in Bhokar today | भोकरमध्ये आज १९४ कोटींच्या विकासकामांचे भूमीपूजन

भोकरमध्ये आज १९४ कोटींच्या विकासकामांचे भूमीपूजन

Next

भोकर : पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाममंत्री पद असल्याने नांदेड जिल्ह्याला झुकते माप मिळत असून विविध विकासकामे मार्गी लागत आहेत. शहर व तालुक्यातील १९४ कोटीच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा शुक्रवार २२ जानेवारी रोजी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

भोकर येथील मोंढा मैदानावर यानिमित्ताने सायंकाळी ४ वाजता जाहीर सभा व आभार सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेतील प्रतोद आमदार अमरनाथ राजूरकर, जि.प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर ,जि.प. कृषी पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हरिहरराव भोसीकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ कोकाटे, जि. प. गटनेता प्रकाश भोसीकर, माजी सभापती नागनाथ घिसेवाड, पं.स. सभापती निता रावलोड, कृउबा संचालक सुभाष पाटील किन्हाळकर, आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

विविध विकास कामांचे भूमिपूजन

हादगाव ,तामसा, भोकर, उमरी, कारेगाव, लोहगाव, रस्त्याचे पेवर शोल्ड सह दुपदरीकरण करणे, भोकर मधील विश्रामग्रहाचे बांधकाम, मुदखेड भोकर रस्ता १६१ ( अ) सुधारणा करणे, भोकर शहरासाठी वळण मार्गाचे बांधकाम, औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, भोकर येथे १८०० मे. टन क्षमतेच्या नवीन शासकीय धान्य गोदामाचे बांधकाम, भोकर नगर परिषद विविध विकास योजनेअंतर्गत १४ कोटीची कामे, अशा विविध विकासकामांचा यावेळी शुभारंभ होणार आहे. यानिमित्ताने आयोजित जाहीर सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जगदीश पाटील भोसीकर ,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अ‍ॅड.शिवाजी कदम, शिवसेनेचे तालुका प्रमुख अमोल पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष इनामदार,उपसभापती गणेश राठोड, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर ,साहेबराव सोमेवाड, गोविंद बाबागौड,शेख युसुफ,उपसभापती नागोराव कोटुळे आदींनी केले आहे.

Web Title: Bhumi Pujan of development works worth Rs 194 crore in Bhokar today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.