मंदिराचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:33 AM2020-12-15T04:33:52+5:302020-12-15T04:33:52+5:30
नागोराव जाधव जयंती मुखेड - उमरदरी येथे जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नागोराव जाधव यांची ८६ वी जयंती ...
नागोराव जाधव जयंती
मुखेड - उमरदरी येथे जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नागोराव जाधव यांची ८६ वी जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी जाधव, रामराव पोलीस पाटील, बालाजी चाफेकर, वसंत जाधव, बालाजी कोनापुरे, देविदास कोनापुरे, विठ्ठल कोनापुरे, तुकाराम कोनापुरे, दत्ता कांबळे, राजू शिंगारे, प्राचार्य एस.एम. सूर्यवंशी, पर्यवेक्षक डी.जी. सोमवारी, प्रा.एन.डी.पांडे, प्रा.देशमुख आदी उपस्थित होते.
शिवकथेस प्रारंभ
नांदेड - ज्ञानेश्वर संजीवनी समाधी सोहळा मूर्ती स्थापनेच्या वर्धापन सोहळ्यानिमित्त हनुमान मंदिर तुप्पा येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला आहे. दरवर्षी सप्ताह घेतला जातो. सप्ताहमध्ये वडगाव, भायेगाव, काकांडी, जांभरून, मारतळा, कामळज, कीकी आदी ठिकाणचे भाविक सहभागी होतात. शिवकथाकार शर्मा महाराज यांच्या समवेत संतोष शर्मा, दीपक मेटे, भागवत शिरफुले, शुभम देवालकर आदी संगीत साथ देत आहेत.
अतिक्रमण थांबविण्याची मागणी
किनवट - पालिकेच्या आरक्षित जागेवर होत असलेले अतिक्रमण त्वरित थांबवून पालिकेने ही जागा आपल्या ताब्यात घ्यावी अशी मागणी नगरसेविका अनुसया आनेलवाड यांनी सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. सुरुवातीला काहीकाळ जागेचे भाडे दिले जाते, नंतर भाडेही देत नाहीत. काही ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. यामध्ये पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे असा आरोप निवेदनात करण्यात आला.