दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:34 AM2020-12-15T04:34:01+5:302020-12-15T04:34:01+5:30

कुटुंबीयांचे सांत्वन लोहा - लोहा तालुक्यातील वाळकी बु. येथील माजी पोलीस पाटील विश्वंभर बेटकर यांच्या पत्नीचे निधन झाले होते. ...

Bicycle lamps | दुचाकी लंपास

दुचाकी लंपास

Next

कुटुंबीयांचे सांत्वन

लोहा - लोहा तालुक्यातील वाळकी बु. येथील माजी पोलीस पाटील विश्वंभर बेटकर यांच्या पत्नीचे निधन झाले होते. खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी बालाजी पाटील मारतळेकर, गणेशराव सावळे, तुकाराम उबाळे, बळीराम बेटकर, भगवान बेटकर, गोविंद बेटकर, मोहन बेटकर, रामदास बेटकर, नागोराव बेटकर, मुन्ना बेटकर, अजिंक्य बेटकर, बालाप्रसाद बेटकर आदी उपस्थित होते.

अखंड हरिनाम सप्ताह

हिमायतनगर - तालुक्यातील कार्ला पी. येथे १५ ते २२ डिसेंबर दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या दरम्यान मान्यवरांचे भजन, कीर्तन होणार आहे. २२ रोजी हभप भागवताचार्य गजानन महाराज जुगनडे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाचा समारोप होईल. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

विवाहितेचा छळ

हदगाव - माहेराहून १० लाख रुपये व दुकान टाकण्यासाठी ५ लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ करून तिला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीविरूद्ध हदगाव पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पोलीस निरीक्षक संगीता कदम तपास करीत आहेत.

मुदखेडमध्ये मुंडे यांना अभिवादन

मुदखेड - येथील लुंबीनीनगर येथे माजीमंत्री गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास भाजपाचे प्रवीण गायकवाड, भगवान पानेवार, नीळकंठ हामंद, शेख रफीक, प्रा.दिनेश शेटे, सतीश पाटील, माधव वाघमारे, केशव पाटील, गंगाधर कसबे, हनीफ कुरेशी, लक्ष्मण पाटील, माराेती गायकवाड आदी उपस्थित होते.

खुलेआम दारू विक्री

नायगाव - तालुक्यातील बरबडा परिसरात गेल्या काही दिवसापासून खुलेआम दारूविक्री सुरू आहे. राज्य उत्पादन खाते आणि पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. कहाळा-कृष्णूर हायवेवर असलेल्या हॉटेल, खानावळमध्ये अवैध दारू विक्री राजरोसपणे सुरू आहे. घुंगराळा भागात दारू विक्री, जुगार अड्डे मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत.

चिखलीकरांच्या भेटीगाठी

मुदखेड - आगामी नगर परिषद निवडणूक एक वर्षावर असताना खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी गेल्या महिनाभरात दोन वेळा मुदखेडला भेटी दिल्या. या दरम्यान त्यांच्यासोबत डॉ.किशोर देशमुख, केतकी चौधरी, मुन्ना चांडक, गोविंद गोपनपल्ले, देवा धबडगे, गजानन कमळे, प्रकाश सूर्यवंशी, कालीदास चौधरी, संतोष फुलारी, राकेश हेमके, डॉ.संतोष चिलवतकर आदी उपस्थित होते.

१०१ जणांचे रक्तदान

किनवट - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त युवकांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात १०१ दात्यांनी रक्तदान केले. यावेळी शिबिराचे आयोजन ॲड.सम्राट सरपे व निखील कावळे यांनी केले. शिबिराला सेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील, आनंद मच्छेवार, बालाजी मुरकुटे, प्रशांत ठमके, संदीप केंद्रे आदींनी भेटी दिल्या.

Web Title: Bicycle lamps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.