मोठी बातमी! नांदेड मृत्यूप्रकरणात त्रिसदस्यीय समितीची रुग्णालय प्रशासनाला क्लिनचीट

By श्रीनिवास भोसले | Published: October 7, 2023 12:38 PM2023-10-07T12:38:35+5:302023-10-07T12:39:20+5:30

मुख्यमंत्र्यांपाठोपाठ आता चौकशी समितीनेही डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाला क्लीन चीट दिली आहे.

Big news! The three-member committee clean-cheats the hospital administration in the Nanded death case | मोठी बातमी! नांदेड मृत्यूप्रकरणात त्रिसदस्यीय समितीची रुग्णालय प्रशासनाला क्लिनचीट

मोठी बातमी! नांदेड मृत्यूप्रकरणात त्रिसदस्यीय समितीची रुग्णालय प्रशासनाला क्लिनचीट

googlenewsNext

नांदेड :  शासकीय रुग्णालयातील मृत्यूकांडानेनांदेड जिल्हा संपूर्ण राज्यभर गाजला. या घटनेत मृत्यू झालेल्या नवजात बालक आणि वृद्धांच्या मृत्यूला डॉक्टर अथवा रुग्णालय प्रशासन जबाबदार नसल्याचा अहवाल तपास समितीने दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांपाठोपाठ आता चौकशी समितीनेही डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाला क्लीन चीट दिली आहे.

24 तासात 24 मृत्यू झाल्याने गांधी जयंती दिनी 2 ऑक्टोबरला नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती दरम्यान सलग तीन दिवस मृत्यूचा आकडा वाढतच असल्याने रुग्णालय प्रशासन आणि सरकारवर टीकेची जोड उठली होती या मृत्यू तांडवाचा तपास करण्यासाठी शासनाने तात्काळ स्त्री सदस्य समिती नियुक्त केली होती यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयाच्या डॉक्टरांचा समावेश होता या समितीने नांदेड येथे येऊन चौकशी आणि तपासणी केली प्रत्येक मृत्यूची कारणे शोधून तसा अहवाल शासनाला पाठविला आहे. छत्रपती संभाजी नगर येथील घाटी रुग्णालयातील डॉ. भारत चव्हाण, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य आणि बालरोग तज्ञ डॉ.जोशी या तिघांचा समितीमध्ये समावेश आहे

काय म्हणते समिती :
•    वेळेपूर्वी जन्मल्याने आणि कमी वजन असल्यामुळे नवजात बालकांचा मृत्यू 
•    अत्यवस्थ रुग्णांनी उपचारांना प्रतिसाद न दिल्याने त्यांचा मृत्यू झाला 
•    कुठेही अत्यावश्यक औषधांचा तुटवडा आढळला नाही – समिती

Web Title: Big news! The three-member committee clean-cheats the hospital administration in the Nanded death case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.