सहा मजली शेतीतून मिळणार कोट्यवधींचे उत्पन्न, इस्त्राईलच्या धरतीवर नांदेडात साकारतेय सेंद्रीय शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:19 AM2021-09-11T04:19:50+5:302021-09-11T04:19:50+5:30
चौकट......... एका गुंठ्यात कमवा १ लाख रुपये इस्रायलच्या तंत्रज्ञानाचा वापर करून सदर शेती केली जात आहे. त्यामुळे सदर शेतीसाठी ...
चौकट.........
एका गुंठ्यात कमवा १ लाख रुपये
इस्रायलच्या तंत्रज्ञानाचा वापर करून सदर शेती केली जात आहे. त्यामुळे सदर शेतीसाठी पहिल्यांदा मोठा खर्च लागतो; परंतु ही गुंतवणूक एकवेळ करून २४ वर्षे उत्पन्न घ्यायचे आहे. तशी हमीदेखील संबंधित कंपनीकडून देण्यात येते. १ गुंठ्यात व्हर्टिकल शेती करण्यासाठी साडेतीन लाख रुपयांपर्यंतचा खर्च येतो. त्यानंतर वर्षाकाठी ९० हजार १ लाख रुपये उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते. यापेक्षाही जास्त मोबदला मिळू शकतो; परंतु कमीत कमी १ लाख रुपयांप्रमाणे २४ वर्षांत २४ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळते, असे शेतकरी खांडेकर यांनी सांगितले.
सहा मजली शेतीचे कुतूहल, बघ्यांची गर्दी
एकाच वेळी केलेली गुंतवणूक ही शेतकऱ्यांना पुढील १२ ते २४ वर्षांपर्यंत लाभदायी ठरणार आहे. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीपासून ही शेती सुरक्षित असणार आहे. हळद लागवड यासह बायॉफ्लोक मत्स्यपालन, मल्टी क्रॉप गार्डन अशी विविध प्रकारची शेती एकावर एक पिकाचे मजले उभारून केली जाणार असल्याचे कुतूहल प्रत्येकालाच आहे. त्यामुळे जानापुरी येथील हा सहा मजले शेतीचा प्रयोग पाहण्यासाठी शेतकरी गर्दी करीत आहेत.
१०० एकरात उभारणार क्लस्टर प्रकल्प
प्रयोगशील आणि होतकरू शेतकऱ्यांना सोबत घेऊन शंभर एकरामध्ये क्लस्टर प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी पॉलिहाऊस उभारले जाईल. वेगवेगळ्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन हा व्हर्टिकल फार्मिंगचा प्रयोग राबविण्यात येणार आहे. त्यासाठी एकाच भागातील शेतकरी एकत्र येणे गरजेचे आहे, असे शेतकरी नितीन कागणे यांनी सांगितले.
क्युरकुमाचे प्रमाण ११ टक्क्यांपर्यंत
कोरोनामुळे हळदीची मागणी वाढल्याने पहिल्यांदा हळद लागवडीचा प्रयोग जानापुरीत राबविला जात आहे. आपल्या हळदीचे क्युरकुमाचे प्रमाण २ ते ३ टक्के असते; परंतु व्हर्टिकल फार्मिंगच्या माध्यमातून पूर्णत: सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या हळदीतील क्युरकुमाचे प्रमाण ६ ते ११ टक्के असते. त्यामुळे या हळदीचा औषधी बनविण्यासाठी खास वापर होतो. परिणामी आपल्या हळदीपेक्षा अधिक भावही मिळतो.