बिलोली बंदला कडकडीत प्रतिसाद, आक्रोश मोर्चाही निघाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:34 AM2020-12-12T04:34:29+5:302020-12-12T04:34:29+5:30
सकाळी ११ वाजता साठेनगर गांधीचौकपासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयासमोर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. सभेत आ. रावसाहेब ...
सकाळी ११ वाजता साठेनगर गांधीचौकपासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयासमोर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. सभेत आ. रावसाहेब अंतापूरकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.शिवाजी पाटील पाचपिंपळीकर, लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रा.रामचंद्र भरांडे, राष्ट्रवादीचे नागनाथ पाटील सावळीकर, अल्पसंख्यांकचे शेख सुलेमान, माजी नगराध्यक्ष भीमराव जेठे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस आनंदराव बिराजदार, सामाजिक कार्यकर्ते उत्तम जेठे, उस्मानाबादच्या ॲड. पुजा देडे, वलीयोद्दीन फारोखी, वंचितचे श्याम कांबळे, मुखेडचे नारायण गायकवाड, प्रकाश पोवाडे आदींनी आरोपींना तत्काळ अटक करून पीडितेच्या कुटुंबीयाचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी यावेळी केली.
मोर्चात माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, रत्नाकर जाधव, गंगाधर कुडके, मार्तंड जेठे, नोमान फारुखी, संदीप कटारे, अफसर कुरेशी, मुकिंदर कुडके, संदेश जाधव, शेख नवाब, बाबू कुडके, रहीम कुरेशी आदींसह विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते, महिला, पुरुष आदींनी सहभाग नोंदविला.
या घटनेची माहिती समजताच अनुसूचित जातीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आ. सुधाकर भालेराव, जिल्हाध्यक्ष गंगाधर कावडे, नारायण गायकवाड यांनी पीडित कुटुंबीयाचे सांत्वन केले. दरम्यान शुक्रवारीच घटनेच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.
संशयिताला पोलीस कोठडी
या प्रकरणी आरोपी साईनाथ निमोड यास पोलिसांनी अटक केली होती. त्याला शुक्रवारी बिलोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) आर.आर.पत्की यांनी ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सरकारची बाजू ॲड.सुधाकर रामेकर यांनी मांडली.
(फोटो कॅप्शन - बिलोली येथे मूकबधिर महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना ९ डिसेंबर रोजी घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी ११ डिसेंबर रोजी बिलोली तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येऊन कडकडीत बंद पाळण्यात आला)
(फोटो क्रमांक - ११एनपीएच डीईसी-०७ जेपीजी)