बिलोलीत घर फोडून ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:23 AM2021-06-09T04:23:02+5:302021-06-09T04:23:02+5:30
शहरात दोन दुचाकी चोरीला शहरातील नांदेड ग्रामीण आणि वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी लंपास करण्यात आल्या. आंबेडकरवादी मिशन ...
शहरात दोन दुचाकी चोरीला
शहरातील नांदेड ग्रामीण आणि वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी लंपास करण्यात आल्या. आंबेडकरवादी मिशन जवळ सुधाकर जळबा गायकवाड यांनी एम.एच. २६, बीएम १२८१ या क्रमांकाची दुचाकी उभी केली होती. तर वजिराबाद भागात रेल्वेस्टेशन जवळ प्रदीप रामसेवक गौतम यांची एम.एच.२६, बीएच ९१७८ या क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली.
रुग्णालयातून डॉक्टरचा मोबाईल लांबविला
शहरातील विठाई हाॅस्पिटलमधून एका डॉक्टरचा मोबाईल लंपास करण्यात आला. ही घटना ६ जून रोजी घडली. मुक्तेश्वर अशोक काटकर यांनी रुग्णालयातील टेबलवर ३५ हजार रुपये किमतीचा मोबाईल ठेवला होता. तो मोबाईल चोरट्याने लांबविला. या प्रकरणात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
परिचारिकेचे पैसे आणि मोबाईल चोरीला
शहरातील संजीवनी रुग्णालयातून एका परिचारिकेच्या पर्समधील पैसे आणि मोबाईल लंपास करण्यात आला. ही घटना ६ जून रोजी घडली. वैशाली विश्वनाथ पाईकराव ही परिचारिका जनरल वाॅर्डमध्ये असताना त्यांच्या पर्समधील १५ हजार रुपयांचा मोबाईल, राेख २ हजार रुपये असा एकूण १७ हजारांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
जागेच्या वादातून शेतकऱ्याला मारहाण
तालुक्यातील गाडेगाव शिवारात जागेच्या वादातून एका शेतकऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना ५ जून रोजी घडली. संभाजी पांडुरंग उबाळे हा शेतकरी विहिरीजवळ थांबलेला असताना त्या ठिकाणी तुकाराम श्यामराव उबाळे, शिवराज तुकाराम उबाळे, अवधूत उबाळे, संतोष उबाळे, काशीनाथ उबाळे हे सर्व जण आले. यावेळी त्यांनी संभाजी उबाळे यांच्यासोबत वाद घालून मारहाण केली. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
धक्का लागल्याने विद्यार्थ्याचे डोके फोडले
देगलूर शहरातील राठोड पेट्रोल पंपाजवळ दुचाकीचा धक्का लागल्याने विद्यार्थ्याचे डोके फोडण्यात आले. प्रशांत प्रकाशराव गंदलवाड हा विद्यार्थी पेट्रोल पंपाजवळ असताना त्याच्या दुचाकीचा नितीन विठ्ठलराव वठमवार यांच्या दुचाकीला धक्का लागला. त्यानंतर वठमवारने प्रशांतचे डोके फोडले. या प्रकरणात देगलूर ठाण्यात गुन्हा नोंद झाला.