निवेदने देऊन खंडणी उकळणा-या टोळीचे बिंग फुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:17 AM2021-02-14T04:17:34+5:302021-02-14T04:17:34+5:30
पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, विशेष पोलीस महानिरीक्षक यांना अवैध बंद करण्याबाबत दररोज वेगवेगळ्या संघटना कार्यकर्ते निवेदन देत असतात. परंतु असे ...
पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, विशेष पोलीस महानिरीक्षक यांना अवैध बंद करण्याबाबत दररोज वेगवेगळ्या संघटना कार्यकर्ते निवेदन देत असतात. परंतु असे निवेदन देऊन नंतर खंडणी उकळण्याचे प्रकार ही घडतात.
मागील आठवड्यात एका टोळीने अशाच प्रकारे निवेदन देऊन मटका बंद करण्याची मागणी केली होती. स्वत:ला एका राजकीय पक्षाचे आपण पदाधिकारी असल्याचे टोळी प्रमुख अधिकाऱ्यांना सांगत होता. तसेच पक्षाचे लेटर पॅड वापरून त्याने निवेदन तयार केले होते. काही नेत्यांना सोबत घेऊन पोलीस अधीक्षक यांच्याकडे जाऊन यांनी निवेदन दिले, नंतर तडजोड करण्यासाठी एका अवैध धंदेवाल्याकडून यांनी ६ लाख रुपयांची खंडणी मागितली सोबतच दर महिन्याला पैसे देण्याचेदेखील महाशय सांगत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी, नेते आपल्या संपर्कात आहेत. पैसे दिले नाही तर कारवाई करायला लावू, अशी धमकीदेखील दिली जात आहे. सध्या सोशयल मीडियावर ही क्लिप प्रचंड व्हायरल झाली आहे.